(Source: ECI/ABP News/ABP Majha)
December 2024 Monthly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी डिसेंबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
December 2024 Monthly Horoscope : ज्योतिषीय गणनेनुसार, डिसेंबर महिन्यात बुध आणि इतर ग्रहांच्या राशीत बदल होणार आहेत. याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येईल.
December 2024 Monthly Horoscope : 2024 वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर महिना लवकरच सुरु होणार आहे. डिसेंबर (December) महिन्यातील ग्रह-ताऱ्यांची स्थिती अतिशय विशेष मानली जाते. ज्योतिषीय गणनेनुसार, डिसेंबर महिन्यात बुध आणि इतर ग्रहांच्या राशीत बदल होणार आहेत. याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येईल. अशातच मेष ते कन्या राशीच्या (Zodiac Signs) लोकांसाठी डिसेंबर महिना कसा राहील? जाणून घ्या
मेष रास (Aries Monthly Horoscope December 2024)
मेष राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा महिना फार लाभदायक ठरणार आहे. या महिन्यात तुम्ही फार उत्साही असाल. तुमच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी असेल. पण. कामकाजाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या बॉसकडून तुमच्या कामाचं कौतुक देखील केलं जाईल. धनवृद्धीचे अनेक योग जुळून येणार आहेत.
वृषभ रास (Taurus Monthly Horoscope December 2024)
वृषभ राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना फार शुभकारक असणार आहे. तुमची पर्सनालिटी चारचौघांत उठून दिसेल. तसेच, तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये देखील चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. जर तरुणांना नवीन नोकरी हवी असल्यास तुम्हाला ती मिळू शकते. या महिन्याच्या मधल्या टप्प्यात तुम्ही एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. जो तुमच्या करिअरसाठी फार गरजेचा असणार आहे. तुमची प्रगती होण्याची पूर्णपणे शक्यता आहे.
मिथुन रास (Gemini Monthly Horoscope December 2024)
मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध ग्रह अस्ताच्या स्थितीत आहे. त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांसाठी हा महिना आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी सांभाळून राहण्याची गरज आहे. कोणीहीह तुमच्या स्वभावाचा गैरफायदा घेश शकत.
कर्क रास (Cancer Monthly Horoscope December 2024)
कर्क राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा महिना फार कठीण असणार आहे. या महिन्यात कर्क राशीच्या आठव्या चरणात शनी असल्यामुळे तुम्हाला संकटांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, खर्चाच्या बाबतीत देखील अनेक चढ-उतार होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला थोडं सांभाळून राहण्याची गरज आहे. या काळात तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गज आहे. कोणावरही विश्वास ठेवू नका.
सिंह रास (Leo Monthly Horoscope December 2024)
सिंह राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा महिना फार खास नसणार आहे. वक्री मंगळ स्थानी असल्यामुळे तुमच्यावर कामाचा वाढता ताण असेल. तसेच, तु्म्ही हातील घेतलेल्या कामात तुम्हाला यश मिळणार नाही. तुमच्या कार्यात सतत अडथळे येण्याची शक्यता आहे. या कालावधीत तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.
कन्या रास (Virgo Monthly Horoscope December 2024)
कन्या राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा महिना चांगला असणार आहे. नोकरदार वर्गातील लोकांसाठी हा काळ फार उत्तम असणार आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळू शकतं. तसेच, जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरु करायाच असेल तर त्यासाठी हा काळ फार चांगला असणार आहे. तुमचं मनदेखील प्रसन्न असेल. त्यामुळे नवीन कार्य तुम्ही सुरु करु शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: