(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Colour Astrology : बुधवारी 'या' रंगांचे कपडे परिधान करा, प्रगती होईल, जीवन होईल सुखी!
Colour Astrology : तुम्हाला माहित आहे का, की गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यात रंगांचेही विशेष महत्त्व आहे.
Colour Astrology : सर्व देवतांमध्ये गणेश हा प्रथम पुजनीय आहे. त्याच्या कृपेने सर्व अडथळे दूर होतात आणि प्रत्येक कार्यात यश प्राप्त होते. बुधवार हा गणपतीला समर्पित आहे. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा केली जाते. असे मानले जाते की बुधवारी गणपतीची आराधना केल्याने दुःखाचा अंत होतो. पण तुम्हाला माहित आहे का, की गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यात रंगांचेही विशेष महत्त्व आहे. त्यामुळे त्यांची पूजा करताना त्यांच्या आवडीच्या रंगाचे कपडे घालणे महत्त्वाचे आहे. चला जाणून घेऊया या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत.
'या' रंगाचे कपडे घाला
-या दिवशी तुम्ही गुलाबी, आकाशी, फिकट पिवळे आणि क्रीम रंगाचे कपडे घालू शकता.
-बुधवारी तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडेही घालू शकता. पांढरे कपडे परिधान केल्याने मनाला शांती मिळते.
-पांढरा रंगही पवित्रतेचे प्रतीक मानला जातो.
-याशिवाय पूजेच्या वेळी तुम्ही लाल रंगाचे कपडे घालू शकता, कारण गणेशाला लाल रंग आवडतो.
-हिरवा रंग गणपतीला प्रिय आहे.म्हणून तुम्ही हिरव्या रंगाचे कपडे घालू शकता.
-बुधवारी तुम्ही हिरव्या आणि पांढऱ्या रंगाचे कपडे देखील घालू शकता.
-कारण हिरवा रंग हा आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :