एक्स्प्लोर

Children Zodiac Sign : मुलं ऐकत नाहीत, कळतंच नाही त्यांचा स्वभाव? काय सांगते त्यांची रास, जाणून घ्या

Children Zodiac Sign : राशीनुसार, ग्रहांची हालचाल सतत बदलत राहते, ज्याचा परिणाम मुलांच्या स्वभावावरही होतो. त्यामुळे त्यांच्या राशींनुसार मुलाचा स्वभाव जाणून घेणं आवश्यक आहे.

Children Zodiac Sign : मुल झाल्यानंतर त्याच्या आई-वडिलांचा दुसरा जन्म होतो, असं म्हटलं जातं. त्याचं खाणं-पिणं, संगोपन, त्याच्या भविष्यासाठीच्य तरतूदी यांभोवतीच जणू काही पालकांचं आयुष्य फिरत असतं. पण त्यासोबतच बाळाचा स्वभाव आणि त्यानुसार त्याला सांभाळून घेण्यासाठी पालकांची कसरत असते. प्रत्येक मुलाचा स्वभाव वेगळा असतो, त्यामुळे त्यांना सहज समजता येत नाही. पण यासाठी ज्योतिष शास्त्र पालकांची काहीशी मदत करु शकेल. 

ज्योतिष शास्त्रानुसार, मुलांच्या सवयी आणि काही मूलभूत गोष्टी त्यांच्या राशीच्या माध्यमातून जाणून घेतल्यास त्यांचा स्वभाव समजू शकतो जेणेकरून त्यांचं भविष्य आणखी चांगलं घडवण्यास पालकांना मदत होईल.

Children Zodiac Sign : मुलं ऐकत नाहीत, कळतंच नाही त्यांचा स्वभाव? काय सांगते त्यांची रास, जाणून घ्या

मेष 

या राशीची मुलं स्वतंत्र आणि धैर्यवान असतात. ते शारीरिकदृष्ट्या खूप मेहनती असतात. या मुलांना शांत बसणं अजिबात आवडत नाही.

वृषभ

ही मुलं स्वभावानं अतिशय शांत असतात. त्यांची काम करण्याची क्षमता अतिशय संथ आहे. कधी कधी स्पर्धेच्या शर्यतीत ही मुलं घाबरतात आणि मागे पडतात.

मिथुन

या राशीची मुले खूप हुशार असतात. ते आपल्या सर्जनशीलतेनं आपल्या जीवनाला योग्य दिशा देतात. त्यांचा स्वभाव अतिशय जिज्ञासू असतो. 

Children Zodiac Sign : मुलं ऐकत नाहीत, कळतंच नाही त्यांचा स्वभाव? काय सांगते त्यांची रास, जाणून घ्या

कर्क 

या राशीची मुलं हुशार आणि खूप लाजाळू असतात. त्यांना एकटं राहायला आवडतं. ते थोडेसे स्वार्थी असतात. त्यांच्याकडून अपेक्षित काम होत नाही तेव्हा त्यांना खूप राग येतो. 

सिंह 

या राशीची मुलं अतिशय महत्त्वाकांक्षी आणि स्वभावानं थोडी गर्विष्ठ असतात. राग आल्यावर ते बऱ्याचदा हाणामारी करतात. ते त्यांच्या मनातील गोष्टी सहजासहजी कोणालाही सांगत नाहीत. 

कन्या

या राशींची मुलं इतरांशी पटकन मैत्री करू शकत नाहीत. या राशीच्या मुलांमध्ये शिकण्याची उर्मी असते आणि त्यांना पुस्तकं वाचण्याची आवड असते.

तूळ

या राशीच्या मुलांचं व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक असतं. प्रत्येकजण त्यांच्यापासून सहज प्रभावित होतो. ते अत्यंत हुशार असतात. 

वृश्चिक

या राशीची मुलं स्वभावानं खूप महत्वाकांक्षी असतात. त्यांच्यात स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता असते. त्यांचे प्रश्न ते स्वतःच सोडवतात. 

Children Zodiac Sign : मुलं ऐकत नाहीत, कळतंच नाही त्यांचा स्वभाव? काय सांगते त्यांची रास, जाणून घ्या

धनु

या राशीची मुलं अतिशय दयाळू, हुशार आणि उत्साही स्वभावाची असतात. त्यांना नवीन ठिकाणी फिरायला आवडतं आणि त्यांना स्वातंत्र्य आवडतं.

मकर

ही मुलं त्यांच्या वयाच्या पलीकडे मोठ्या गोष्टी बोलतात. ते खूप महत्त्वाकांक्षी आणि मेहनती असतात. त्यांना प्रत्येक काम खूप छान आणि व्यवस्थित करायला आवडतं. 

कुंभ

या राशीची मुलं खूप हुशार, समंजस आणि बुद्धिमान असतात. त्यांना सर्व काही जाणून घेण्याची उत्सुकता असते. कोणतंही काम करण्याची इच्छा त्यांच्यामध्ये असते.

मीन

मीन राशीची मुलं खूप हुशार असतात आणि सर्वकाही सहज समजतात. ते स्वभावानं अतिशय संवेदनशील, दयाळू आणि उदार असतात. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Holidays In March 2025 : मार्चमध्ये सार्वजनिक सुट्टी किती दिवस? बँका किती दिवस बंद राहणार? संपूर्ण यादी एका क्लिकवर
मार्चमध्ये सार्वजनिक सुट्टी किती दिवस? बँका किती दिवस बंद राहणार? संपूर्ण यादी एका क्लिकवर
Nanded Gain bitcoin Cryptocurrency Scam: महाराष्ट्रात 6600 कोटींचा बिटकॉईन घोटाळा, महिन्याला 10 टक्के व्याजाच्या सापळ्यात गुंतवणुकदार फसले
महाराष्ट्रात 6600 कोटींचा बिटकॉईन घोटाळा, महिन्याला 10 टक्के व्याजाच्या सापळ्यात गुंतवणुकदार फसले
Weather Update: उत्तर -दक्षिणेत तुफान पावसाची शक्यता, महाराष्ट्रात 6 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट, IMD चा सविस्तर अंदाज वाचा
उत्तर -दक्षिणेत तुफान पावसाची शक्यता, महाराष्ट्रात 6 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट, IMD चा सविस्तर अंदाज वाचा
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhimashankar Mahashivratri 2025:महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दीABP Majha Headlines : 07 AM : 26 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सPrajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special ReportMalvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Holidays In March 2025 : मार्चमध्ये सार्वजनिक सुट्टी किती दिवस? बँका किती दिवस बंद राहणार? संपूर्ण यादी एका क्लिकवर
मार्चमध्ये सार्वजनिक सुट्टी किती दिवस? बँका किती दिवस बंद राहणार? संपूर्ण यादी एका क्लिकवर
Nanded Gain bitcoin Cryptocurrency Scam: महाराष्ट्रात 6600 कोटींचा बिटकॉईन घोटाळा, महिन्याला 10 टक्के व्याजाच्या सापळ्यात गुंतवणुकदार फसले
महाराष्ट्रात 6600 कोटींचा बिटकॉईन घोटाळा, महिन्याला 10 टक्के व्याजाच्या सापळ्यात गुंतवणुकदार फसले
Weather Update: उत्तर -दक्षिणेत तुफान पावसाची शक्यता, महाराष्ट्रात 6 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट, IMD चा सविस्तर अंदाज वाचा
उत्तर -दक्षिणेत तुफान पावसाची शक्यता, महाराष्ट्रात 6 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट, IMD चा सविस्तर अंदाज वाचा
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
Embed widget