एक्स्प्लोर

Chandra Gochar : चंद्र 29 नोव्हेंबरला करणार राशी परिवर्तन, 'या' चार राशींच्या लोकांना येणार चांगले दिवस, वाढेल सुख-संपत्ती

Chandra Rashi Parivartan news in marathi : मनाचा कारक असलेला चंद्र ग्रह 29 नोव्हेंबरला राशी परिवर्तन करणार आहे, याचा चार राशींना विशेष लाभ होईल.

Chandra Gochar : ज्योतिष शास्त्रानुसार, चंद्राला (Moon) मनाचा कारक मानलं जातं. कुंडलीत चंद्र कमजोर असल्यास व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आणि चंद्राच्या उच्च स्थानामुळे व्यक्तीला समाजात खूप मानसन्मान मिळतो. करिअरमध्ये अपार यश मिळतं, मन शांत आणि प्रसन्न राहतं.

चंद्र हा ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करत असतो. त्यानुसार, 29 नोव्हेंबरला चंद्र वृषभ राशीतून बाहेर पडून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे आणि 1 डिसेंबरला लगेचच कर्क राशीत प्रवेश करणार आहे. चंद्राच्या या वेगवान राशी बदलाचा चार राशींना (Zodiac Signs) मोठा लाभ होणार आहे. जाणून घेऊया या नशीबवान राशींबद्दल...

वृषभ रास (Taurus)

चंद्राची विशेष कृपा वृषभ राशीच्या जातकांवर असणार आहे. चंद्राच्या राशी परिवर्तनामुळे आणि त्याच्या शुभ प्रभावामुळे मानसिक तणाव कमी होईल. मनातील नकारात्मक विचार पळून जातील. सुख-समृद्धी वाढेल. आरोग्यात सुधारणा होईल. पती-पत्नीमधील संबंध अधिक दृढ होतील. प्रेमप्रकरणात असाल तर प्रियकरासोबतचे प्रेमसंबंध घट्ट होतील.

कर्क रास (Cancer)

कर्क राशीला चंद्राच्या राशी बदलाचा लाभ मिळेल. कर्क राशीच्या लोकांना करिअरमध्ये प्रगतीचा योग आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. मन प्रसन्न राहील, त्यामुळे कामात उत्साह वाटेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायात आर्थिक लाभाची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्तीनं अभ्यास करावा आणि ज्ञान आत्मसात करावं.

तूळ रास (Libra)

चंद्रदेवांच्या कृपेमुळे तुमची करिअरमध्ये मोठी प्रगती होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. गुंतवणुकीतून आर्थिक लाभाचा योग आहे. वारसा हक्काच्या मालमत्तेतून लाभ मिळू शकतो. नशीब तुम्हाला साथ देईल. आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतील. रखडलेली कामं पूर्ण होतील. तुमचं आरोग्य ठणठणीत राहील.

धनु रास (Sagittarius)

शुभवार्ता कानी पडेल. घरात आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण राहील. मानसिक तणाव दूर होईल. अनपेक्षित धनलाभाचा योग आहे. लग्न जमवण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यात यश येईल. उसने दिलेले पैसे परत मिळतील. संपत्ती वाढेल. व्यवसायात प्रगतीचा योग आहे. एकंदर जीवन आनंदी असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Numerology 28 November 2023 : आज 'या' जन्मतारखेच्या लोकांना अचानक धनप्राप्तीचे योग; अंकशास्त्रानुसार तुमचं भविष्य काय? जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Gemini August Monthly Horoscope 2026 : मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
Hindu Religion: देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
Taurus August Monthly Horoscope 2026 : वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य
वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य
तुलसीदासांना अभिप्रेत असलेले 'श्रीराम'!
तुलसीदासांना अभिप्रेत असलेले 'श्रीराम'!

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
Embed widget