एक्स्प्लोर

Chandra Grahan 2025 : चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी नक्की करावीत 'ही' 5 कामं; बाळाच्या वाढीवर होईल सकारात्मक परिणाम

Chandra Grahan 2025 : शास्त्रानुसार, चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काही काम करणं गरजेचं आहे. जेणेकरुन, बाळावर नकारात्मक परिणाम होणार नाही.  

Chandra Grahan 2025 : वैदिक शास्त्रानुसार, आज म्हणजेच 7 सप्टेंबर 2025 रोजी वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण (Chandra Grahan 2025) लागणार आहे. हे चंद्रग्रहण शनीच्या कुंभ राशीत लागणार आहे. या चंद्रग्रहणाची सुरुवात भारतीय वेळेनुसार, रात्री 9 वाजून 57 मिनिटांपासून होणार आहे. तर, रात्री 1 वाजून 26 मिनिटांनी होईल. हे चंद्रग्रहण भारतातदेखील लागणार आहे. त्यामुळे भारतात देखील याचा सूतक काळ मान्य असणार आहे. 

चंद्रग्रहणाचा सूतक काळ 9 तास आधीपासूनच सुरु होणार आहे. चंद्रग्रहणाचा सूतक काळ दुपारी 12 वाजून 58 मिनिटांनी सुरु होणार आहे. मान्यतेनुसार, या दरम्यान गर्भवती महिलांना कोणतंही कार्य करण्यास सांगितलं जात नाही. कारण यामुळे बाळाच्या वाढीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मात्र, शास्त्रानुसार, चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काही काम करणं गरजेचं आहे. जेणेकरुन, बाळावर नकारात्मक परिणाम होणार नाही.  यासाठीच ग्रहण काळात गर्भवती महिलांनी काय करावं ते जाणून घेऊयात. 

चंद्रग्रहणात गर्भवती महिलांनी 'ही' कार्य करावीत 

1. मंत्राचा जप आणि प्रार्थना (Mantra Jaap and Prayer)

ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घराच्या देव्हाऱ्यात बसून देवी दैवतांचं स्मरण करावं. तसेच, मंत्राचा जप करावा. यामुळे बाळावर नकारात्मक ऊर्जेचा परिणाम होणार नाही. तसेच, हनुमान चालीसाचं पठण करा. धार्मिक मंत्रांचे जप करा. 

2. ध्यान आणि भजन (Meditation And Bhajan)

चंद्रग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी शांत वातावरणात ध्यान करावं. तसेच, भजन-कीर्तन करावं. यामुळे बाळाचा मानसिक आणि आध्यात्मिक विकास होण्यास मदत होईल. 

3. तुळशीची पाने (Tulsi Leaves)

चंद्रग्रहणाच्या काळात गर्भवती महिला आपल्या हातात तुळशीची पानं ठेवू शकतात. मान्यतेनुसार, हे सुरक्षा कवच म्हणून कार्य करते. तसेच, बाळाचं हानिकारक ऊर्जेपासून संरक्षण करते. 

4. डोकं आणि पोट झाकून ठेवा 

चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी ओढणी किंवा हलका कपडा घेऊन आपलं डोकं आणि पोट झाकून ठेवावं. यामुळे नकारात्मक प्रभाव पडत नाही अशी धार्मिक मान्यता आहे. ग्रहण काळ संपल्यास पवित्र गंगाजलाने स्नान करा. तसेच, नवीन आणि स्वच्छ करडे परिधान करा.                         

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :                                       

Chandra Grahan 2025 : सावधान! आज संध्याकाळी 'ही' 5 कामं करु नका; आयुष्यभर होईल पश्चात्ताप, पदोपदी राहा सावध

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: आषाढ अमावस्येला 'गटारी' नाव कसे पडले? का साजरी करतात गटारी? अमावस्येची तिथी? धार्मिक, शास्त्रीय महत्त्व जाणून थक्क व्हाल...
आषाढ अमावस्येला 'गटारी' नाव कसे पडले? का साजरी करतात गटारी? अमावस्येची तिथी? धार्मिक, शास्त्रीय महत्त्व जाणून थक्क व्हाल...
Hindu Religion: देवाची पूजा करताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू का येतात? अचानक जांभई का येते? कमी लोकांना माहित, धार्मिक, शास्त्रीय कारण..
देवाची पूजा करताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू का येतात? अचानक जांभई का येते? कमी लोकांना माहित, धार्मिक, शास्त्रीय कारण..
Horoscope Today 11 August 2026 : आज मंगळवारचा दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! बजरंगबलीच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, अचानक धनलाभ; 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! बजरंगबलीच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, अचानक धनलाभ; 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Gajkesari Rajyog: 4 राशींचं भाग्य फळफळलं! आज गजकेसरी राजयोगासह जुळले शुभ संयोग, कुबेराची आठवडाभर कृपा, पैसा, नोकरी, प्रेम.....
4 राशींचं भाग्य फळफळलं! आज गजकेसरी राजयोगासह जुळले शुभ संयोग, कुबेराची आठवडाभर कृपा, पैसा, नोकरी, प्रेम.....

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Embed widget