Chanakya Niti : नवरा-बायकोच्या नात्यात 'या' गोष्टी कधीच शेअर करु नका; घटस्फोट झालाच म्हणून समजा; चाणक्य सांगतात...
Chanakya Niti : लग्न हे खरंतर फक्त दोन जीवांचंच नाही तर विश्वासाचं अतूट नातं आहे. पती-पत्नीच्या नात्यात विश्वासाबरोबरच समजूतदारपणाही गरजेचा आहे.

Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महान आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. ते भारतीय राजकारण आणि नैतिकतेसाठी ओळखले जातात. शिक्षक आणि तत्त्वज्ञ म्हणूनही त्यांची ओळख आहे. आचार्य चाणक्यांचे (Chanakya Niti) विचार आजच्या काळातही तितकेच लागू होतात. त्यामुळे लोकांच्या प्रती त्यांचा आदर फार आहे. आचार्य चाणक्यांनी पती-पत्नीच्या नात्याबद्दल संसाराबद्दल अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आजच्या काळात तंतोतंत जुळतात.
लग्न हे खरंतर फक्त दोन जीवांचंच नाही तर विश्वासाचं अतूट नातं आहे. पती-पत्नीच्या नात्यात विश्वासाबरोबरच समजूतदारपणाही गरजेचा आहे. त्यामुळे चाणक्यांनी अशा काही गोष्टींची माहिती फार पूर्वीपासून दिली होती की कोणत्या चुकांमुळे नातं तुटू शकते. बऱ्याचदा प्रेमात किंवा विश्वासात पत्नी पतीसोबत अशा गोष्टी शेअर करते, ज्यामुळे नंतर नात्यात कलह आणि घटस्फोट होऊ शकतो. त्यामुळेच पत्नीने पतीला काही गोष्टी सांगू नयेत असं चाणक्यांचं म्हणणं आहे.
पत्नीने पतीला 'हे' सांगू नका
लग्नानंतर अनेकदा महिला आपल्या माहेरच्या घराबद्दल प्रत्येक लहान-मोठी गोष्ट आपल्या पतीला सांगतात, परंतु चाणक्य नीतीनुसार, ही सवय चुकीची आहे. कारण भांडणात याच गोष्टी तुमच्याविरुद्ध वापरल्या जाऊ शकतात.
खोटं बोलू नका
चाणक्य म्हणतात की पती-पत्नीच्या नात्याचा पाया विश्वास आहे. जर पत्नी खोटं बोलली आणि सत्य बाहेर आले तर नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.
पतीची तुलना कोणाशीही करू नका
तुमच्या पतीची तुलना कधीही इतर कोणत्याही पुरुषाशी करू नका. मग तो मित्र असो, सहकारी असो किंवा नातेवाईक असो. असे केल्याने पतीला दुखापत होते आणि त्याच्या आत्मसन्मानावर परिणाम होतो. ही चूक नात्यात अंतर वाढवण्याचे एक मोठे कारण बनू शकते.
रागाच्या भरात कटू गोष्टी बोलू नका
प्रत्येक नाते चढ-उतारांमधून जाते, परंतु रागाच्या भरात पतीला कटू शब्द बोलल्याने नाते तुटू शकते. चाणक्य यांच्या मते, रागाच्या भरात बोललेले शब्द बाणांसारखे असतात, जे जखमा सोडतात. चाणक्य नीती केवळ राजकारण आणि पैशाच्या व्यवस्थापनापुरती मर्यादित नव्हती, तर त्यांनी मानवी जीवन आणि वैवाहिक संबंधांवरही सखोल शिकवण दिली आहे. जर पत्नीने या गोष्टी लक्षात ठेवल्या तर वैवाहिक जीवन आनंदी आणि मजबूत होऊ शकते.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















