Chanakya Niti: चाणक्यांच्या 'या' महत्वाच्या गोष्टी यशाचा मार्ग मिळवून देतात, जे आचरणात आणतात, त्यांचा होतो विजय!
Chanakya Niti: वैवाहिक जीवन, यश, नोकरी, मैत्री या प्रत्येक विषयात चाणक्यांनेी खोलवर अभ्यास केला आहे. चाणक्यांचे 6 श्लोक माणसाचा यशाचा मार्ग सोपा करतात
Chanakya Niti : आचार्य चाणक्यांनी आपले अमूल्य विचार श्लोकांमध्ये मांडले आहेत. शिक्षण, वैवाहिक जीवन, यश, नोकरी, मैत्री या प्रत्येक विषयाचे महत्व चाणक्यांनी सांगितले आहे. आचार्य चाणक्यांनी (Chanakya) आपल्या धोरणांमध्ये एक गोष्ट नमूद केली आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावते. जाणून घ्या चाणक्याचे 6 श्लोक, जे माणसाला योग्य मार्ग दाखवून यशाकडे घेऊन जातात. चाणक्यनीतीत काय सांगितलंय...
ते पुत्रा ये पितुर्भक्ताः सः पिता यस्तु पोषकः। तन्मित्रं यत्र विश्वासः सा भार्या या निवृतिः॥
मुलगी किंवा मुलगा तोच असतो जो आपल्या वडिलांची सेवा करतो. पिता तोच असतो जो आपल्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घेऊ शकतो. मित्र तोच असतो ज्यावर विश्वास ठेवतो आणि पत्नी ती असते जी तुम्हाला नेहमी आनंदी ठेवते. या सर्वांनी आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडल्या तर जीवन आनंदाने आणि शांततेने जाते.
प्रभूतंकार्यमल्पंवातन्नरः कर्तुमिच्छति। सर्वारंभेणतत्कार्यं सिंहादेकंप्रचक्षते॥
माणसाने आपले ध्येय साध्य करण्यासाठी सिंहासारखे वागले पाहिजे. सिंह ज्या प्रकारे आपल्या भक्ष्यावर लक्ष ठेवतो, एकाग्रतेने त्याच्याकडे पाहतो आणि सर्व शक्तीनिशी शिकार पकडण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे माणसाने कोणतेही काम पूर्ण ताकदीने आणि एकाग्रतेने केले पाहिजे.
नात्यन्तं सरलैर्भाव्यं गत्वा पश्य वनस्थलीम्। छिद्यन्ते सरलास्तत्र कुब्जास्तिष्ठन्ति पादपाः॥
माणूस साधा सरळ स्वभावाचा नसावा. ज्याप्रमाणे जंगलातील झाडांमध्ये सरळ झाडे तोडली जातात, त्याचप्रमाणे चतुर लोक सरळ आणि साध्या स्वभावाच्या माणसाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करतात.
विषादप्यमृतं ग्राह्यममेध्यादपि काञ्चनम्। नीचादप्युत्तमां विद्यांस्त्रीरत्नं दुष्कुलादपि।।
चाणक्य म्हणतात की विषातूनही, शक्य असल्यास अमृत काढा. म्हणजेच, चांगले ज्ञान आणि चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजेत, मग ते कोठेही असोत किंवा कोणाच्याही द्वारे उपलब्ध असतील. सोने घाणीत पडले असेल तर उचलून घ्या. जर कोणी खालच्या कुळात जन्मला असेल आणि तो तुम्हाला ज्ञान देत असेल तर त्याला गुरू माना. ज्ञानाचा सर्वत्र उपयोग होतो.
अधीत्येदं यथाशास्त्रं नरो जानाति सत्तमः । धर्मोपदेशं विख्यातं कार्याऽकार्य शुभाऽशुभम् ।। .
चाणक्यनीतीच्या या श्लोकाचा अर्थ असा आहे की जो मनुष्य शास्त्राच्या नियमांचे सतत आचरण करून शिक्षण घेतो, त्याला योग्य, अयोग्य आणि शुभ कर्मांचे ज्ञान होते. अशा व्यक्तीला उत्तम ज्ञान असते. म्हणजे अशा लोकांना जीवनात अपार यश मिळते.
आपदर्थे धनं रक्षेद्दारान् रक्षेध्दनैरपि । नआत्मानं सततं रक्षेद्दारैरपि धनैरपि ।।
चाणक्यनीतीनुसार माणसाने येणाऱ्या संकटांपासून वाचण्यासाठी पैशाची बचत केली पाहिजे. संपत्तीचा त्याग करूनही त्याने आपल्या पत्नीचे रक्षण केले पाहिजे. पण जीवाच्या सुरक्षेचा प्रश्न आला तर त्याने पैसा आणि पत्नी या दोन्ही गोष्टी व्यर्थ समजाव्यात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Chanakya Niti: वैवाहिक नात्यात सुख-शांती टिकवून ठेवण्यासाठी पत्नीने हे काम अवश्य केले पाहिजे, चाणक्यनीतीत म्हटलंय...