Capricorn Horoscope Today 20 November 2023 : आज मित्राच्या मदतीने उत्पन्नाच्या अनेक संधी उपलब्ध; वाचा मकर राशीचं भविष्य
Capricorn Horoscope Today 20 November 2023 : तुमच्या कुटुंबाची स्थिती अधिक आनंददायी असेल.
Capricorn Horoscope Today 20 November 2023 : मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला राहील. तुम्ही काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता, जिथे तुम्हाला मनःशांती मिळेल. नोकरी करणार्या लोकांबद्दल बोलायचे तर तुम्हाला तुमच्या नोकरीत काही कामाचा ताण जाणवेल. विरोधकांपासून थोडे सावध राहा. तुमची निंदा करू शकतात. ऑफिसमध्ये तुम्ही तुमच्या विरोधकांपासून थोडे सावध राहा. संध्याकाळी कुटुंबीयांबरोबर कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखू शकता. तुम्ही समाजसेवक असाल तर समाजात तुमचा मान आणि प्रतिष्ठा अबाधित राहील आणि तुम्ही समाजासाठी काम करत राहाल. यामुळे समाजातील लोक तुमच्या कामाचे खूप कौतुक करतील.
तुमच्या कुटुंबाची स्थिती अधिक आनंददायी असेल. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. नोकरीत असलेल्या लोकांना त्यांच्या पदांवर बढती मिळू शकते. तुम्ही तुमच्या वरिष्ठांच्या विश्वासाला पात्र असाल. तुमचा पगार वाढू शकतो. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर तुम्हाला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. पोटाशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. अन्यथा, तुम्हाला डॉक्टरकडेही जावे लागेल. त्यामुळे आहारात संतुलन ठेवा.
मित्राच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी उपलब्ध
आजच्या दिवशी मित्रााचं सहकार्य तुमच्यासाठी फार मोलाचं ठरणार आहे. मित्राच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी उपलब्ध असतील. तसेच, घर, फ्लॅट इत्यादी खरेदी करण्याची योजना आखण्यासाठी चांगला दिवस आहे. जे प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतात, त्यांना आज चांगली डील मिळू शकते. नातेवाईकांकडून चांगली सुवार्ता समजेल. भावंडांविषयी कौतुक वाटेल. धार्मिक गोष्टीत उत्साह टिकून राहील.
आज मकर राशीचे आरोग्य
आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी अति ताणामुळे मानसिक तणाव जाणवू शकतो. अशा वेळी शांत बसून ध्यान करणं फायदेशीर ठरेल.
मकर राशीसाठी आजचे उपाय
पिवळे वस्त्र परिधान करून केळीच्या झाडाची पूजा करा आणि संध्याकाळी तुळशीच्या झाडावर तुपाचा दिवा लावा.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :