(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Budget 2023 Astrology Prediction : 2023 चा अर्थसंकल्प 'या' राशींसाठी फायदेशीर! सर्वसामान्यांसाठी कसा असेल यंदाचा अर्थसंकल्प?
Budget 2023: आज 1 फेब्रुवारी 2023 रोजी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षीचा अर्थसंकल्प अनेक वर्ग आणि अनेक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे.
Budget 2023 Astrology Prediction, Rashibhavishya: आज बुधवार, 1 फेब्रुवारी 2023 रोजी, भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2023 चा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करतील. प्रत्येक वर्गातील लोक याबद्दल उत्सुक आहेत. अखेर 2023 चा अर्थसंकल्प कसा असेल? हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा असेल की नाही? यामुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मिळतील. 2023 चा अर्थसंकल्प कोणत्या राशींसाठी शुभ राहील? वास्तु ज्योतिषतज्ज्ञ दीप्ती जैन यांच्याकडून बजेट 2023 बद्दल जाणून घ्या (Budget 2023 Astrology)
2023 चा अर्थसंकल्प कोणत्या राशींसाठी शुभ राहील?
जर आपण राशीनुसार पाहिलं, तर ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षीचा सर्वसाधारण अर्थसंकल्प अनेक राशींसाठी शुभ आणि फलदायी असणार आहे.
मेष- मेष राशीच्या लोकांसाठी बजेट 2023 शुभ आणि फलदायी असेल. आर्थिक प्रगती, उच्च पद आणि मान-सन्मान वाढेल. घराचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते.
वृषभ - हा अर्थसंकल्प वृषभ राशीच्या लोकांसाठी धनलाभ देणारा असेल. विविध योजनांवर सरकारी शिक्कामोर्तब होणार, त्यामुळे प्रगती निश्चित आहे.
सिंह - सिंह राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा योग आहे. बेरोजगारांना रोजगार मिळेल. 2023 चा अर्थसंकल्प तुमच्यासाठी वरदान ठरेल.
कन्या - कन्या राशीच्या लोकांसाठी हे बजेट फायदेशीर ठरेल. प्रशासनाकडून लाभ आणि सरकारी क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे.
मकर- ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायात स्थिरता आणि वाढ होण्याची चिन्हे आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार भारतातील सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्प 2023 कसा असेल?
ज्योतिषशास्त्रानुसार, 2023 चा अर्थसंकल्प आज सादर करण्यात येईल, ज्यामध्ये सरकारच्या योजना या मुख्यत्वे देशाच्या आर्थिक विकासावर आणि सामान्य जनतेच्या हितावर केंद्रित असतील. गेल्या काही वर्षांत कोरोनानंतर सर्वसामान्य जनता आता बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत या अर्थसंकल्पात काही नवीन सवलती आणि योजना लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
आत्मनिर्भर भारत योजनेला अधिक बळकट करण्यासाठी विकास धोरण तयार केले जाईल. ज्यामध्ये वाहतूक दळणवळणाच्या क्षेत्राशी निगडित लोकांना थोडा दिलासा मिळेल.
बुधाच्या शुभ प्रभावामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. टॅक्स स्लॅबमध्ये सकारात्मक बदल करून, हे व्यावसायिक आणि महिलांना, विशेषत: तरुण महिलांना मदत करेल. जे नवीन स्टार्टर्स आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, यासाठी नवीन कृषी योजना राबवणार आहेत.
सूर्य हा ग्रह, जो उत्पादन आणि उर्जेचा ग्रह आहे. त्याच्या प्रभावाने, सरकार उद्योगपतींच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य देऊन देशाच्या आत्मनिर्भरतेला आधार देईल.
शैक्षणिक क्षेत्रात विशेषत: बालशिक्षण आणि कन्या विकास स्वावलंबन अभियानांतर्गत अनेक नवीन योजनांना सूट मिळणार आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात देशातील विविध धार्मिक संस्थांच्या जीर्णोद्धारासाठी संस्थांना योग्य ती मदत केली जाणार आहे.
मंगळाच्या शुभ प्रभावामुळे गृहकर्जाच्या व्याजदरात कपात होण्याची शक्यता असून, त्यामुळे सर्वसामान्यांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न साकार होणार आहे.
मेक इन इंडिया कार्यक्रमाला बळ देण्यासाठी अनेक योजना सादर केल्या जात आहेत. दहाव्या घरात शनीच्या राशीपरिवर्तनामुळे रोजगार देणारी योजना मांडण्यात येणार आहे.
सरकारचा हा अर्थसंकल्प शिक्षण प्रसार आणि रोजगार निर्मिती क्षेत्रावर अधिक भर देणार आहे. बुध ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे दळणवळणाच्या योजनांचा विस्तार होईल. देशाच्या वाहतुकीचा महत्त्वाचा भाग असलेल्या भारतीय रेल्वेला भारत सरकार सर्वोत्तम सवलती देण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे व्यवसाय वाढेल आणि रोजगारही वाढेल.
एकूणच या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या हिताची योजना मांडण्यात येणार आहे. वाहतूक, रोजगार, महिलांचा विकास आणि स्वावलंबी भारत या उद्देशाने मांडण्यात येणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या