Astrology Tips : 'असे' संकेत दिसले तर समजून जा, लक्ष्मी देवीची कृपा बरसणार! घरात धन-समृद्धी येणार
Astrology Tips : ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तीला धन मिळण्याची शक्यता असते किंवा माता लक्ष्मीची कृपा होणार असेल, तर त्याला आधीच काही शुभ चिन्हे दिसू लागतात.
Astrology Tips : संपत्तीची देवी माता लक्ष्मी हिला भगवान विष्णूची पत्नी आहे. भगवान विष्णूची पूजा करण्यासोबतच लक्ष्मीची पूजा केल्याने घरात धनसंपत्ती येते. ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तीला धन मिळण्याची शक्यता असते किंवा माता लक्ष्मीची कृपा होण्याची शक्यता असते, त्याला आधीच काही शुभ संकेत दिसू लागतात. त्यामुळे माता लक्ष्मीच्या कृपेने धन, वैभव आणि ऐश्वर्यामध्ये वाढ होते, तसेच लोकांच्या मान-सन्मानातही वाढ होते. त्यांची कीर्ती चारही दिशांना पसरली जाते. असे कोणते संकेत आहेत ते, जाणून घेऊया?
माता लक्ष्मीची कृपा होणार असेल, तर आगमनापूर्वी संकेत 'असे' असतील
-अचानक काळ्या मुंग्या आल्या आणि तुमच्या घराच्या अंगणात किंवा दारात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी काही खाल्ल्या किंवा समूहाने एकत्र जमल्या तर लक्ष्मी देवीची कृपा वाढणार आहे. याचाच अर्थ तुमची थांबलेली कामे लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत, हे स्पष्ट लक्षण आहे
जर तुमच्या घराच्या कोणत्याही भिंतीवर तीन सरड्यांचा समूह एकत्र दिसत असेल तर हे देखील देवी लक्ष्मीचे शुभ लक्षण आहे. यामुळे घरातील गरिबी दूर झाल्याचेही सूचित होते.
जर तुम्हाला अचानक तुमच्या उजव्या हाताला खाज सुटू लागली तर हे स्पष्ट लक्षण आहे की तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होणार आहे.
तसे, पक्ष्यांचे घरटे बनवणे ही एक सामान्य गोष्ट आहे. पण जर तुमच्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यात पक्ष्याने घरटे बनवले तर ते देवी लक्ष्मीच्या आगमनाचे शुभ लक्षण आहे.
जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत एखादी व्यक्ती झाडू मारताना दिसली तर समजा तुमच्या घरातील संकटे दूर होणार आहेत, तुम्हाला पैसे मिळणार आहेत.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्त्वाच्या बातम्या :
- 'या' राशीच्या लोकांना त्रास देण्यासाठी येणार शनि, चुकूनही करून नका 'हे' काम
- Mars Transit 2022 : 'या' राशींच्या लोकांच्या वाढणार अडचणी
- Astrology : 'या' राशींच्या व्यक्ती पैशांचा करतात योग्य वापर