आई-वडील, भावा-बहिणींशी तोडून वागताय, अपमान करताय; याचा परिणाम होतो थेट तुमच्या पत्रिकेतील ग्रहांवर, उपाय काय?
Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आपल्या नात्यावर देखील परिणम करतात. सूर्य वडिल, चंद्र आई, मंगळ बहिण भावाच्या नात्यावर परिणाम करतो.
Astrology: ज्योतिषशास्त्रामध्ये (Astrology) माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या शुभ आणि अशुभ घटनांना ग्रह जबाबदार मानले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्र बदलल्याने चढ-उताराची परिस्थिती निर्माण होते. एवढच नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आपल्या नात्यावर देखील परिणम करतात. सूर्य वडिल, चंद्र आई, मंगळ बहिण भावाच्या नात्यावर परिणाम करतो. आज आपण जाणून घेणार आहे की, कोणत्या ग्रहाचा कोणत्या नात्यावर परिणाम होत. आपण त्या ग्रहाशी संबंधित उपाय करून त्याचे वाईट परिणाम टाळू शकतो.
सूर्य
ग्रहांविषयी बोलायचे तर ग्रहांचा स्वामी स्वामी सूर्यदेव आहे. जर कोण आपल्या वडिलांचा आदर करत नसेल त्यांना मानसन्मान देत नसेल तर ती व्यक्ती आपल्या कुंडलीतील सूर्य कमजोर करते. कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत करण्यासाठी रोज सूर्याला अर्घ्य द्यावे.
चंद्र
आईशी गैरवर्तन केल्याने तुमच्या कुंडलीतली चंद्र कमजोर होऊ शकतो. चंद्राची स्थिती सुधारण्यासाठी, आईचा आदर करा आणि आनंदी ठेवा. तसेच पौर्णिमा व्रत पाळावे.
मंगळ
मंगळामुळे तुमचे सासरच्या नातेवाईकांसोबतचे संबध ठरतात. सासरे, काका, मावशी, मामा आणि इतर नातेवाईकांशी तुमचे संबंध चांगले किंवा वाईट आहेत. मंगळ बलवान असेल तर तुमचे सासरचे संबंध देखील चांगले राहतात. कुंडलीतील मंगळाची स्थिती बलवान करण्यासाठी हनुमानाची पूजा करा.
बुध
बुध हा ग्रह भावंड, मामा, मामा, आजी-आजोबा आणि अगदी विरोधकांशी संबंध निर्माण करू शकतो किंवा तोडू शकतो. अशा परिस्थितीत दर बुधवारी श्रीगणेशाची पूजा केल्याने त्याच्याशी तुमचे संबंध सुधारतील.
बृहस्पती
आजी-आजोबा आणि पूर्वज यांचा संबध देवगुरु बृहस्पतीशी आहे. त्यामुळे आजी-आजोबा आणि वडिलधाऱ्यांचा आदर करा, त्यांना वेळोवेळी कपडे आणि मिठाई भेट द्या.
शनि
शनिमुळे वडील, सासू, मुलगा-मुलगी आणि मित्र यांच्याशी संबंध सुधारू शकतात.शनिवारी काळ्या वस्तूंचे दान करा.
राहू - केतू
केतू आजोबाशी संबंधित आहे, तर राहू आजोबांबरोबरच सासरच्या लोकांशी संबंधित आहे. त्यांच्यासोबतचे चांगले संबंध तुम्हाला अनपेक्षित फायदे आणि जीवनात प्रगतीची संधी देतात. ऑफिसमध्ये सर्व काही चांगले झाले पाहिजे आणि लोकांनी तुमची स्तुती करावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही शनि, राहू आणि केतू या तिन्ही ग्रहांना खुश ठेवावे. कार्यालयातील तुमच्या सहकाऱ्यांना महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा तरी मिठाई घेऊन जा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :