(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Astrology : आज सिद्ध योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 5 राशींना लाभच लाभ, अनपेक्षित मार्गांनी पैसा येणार
Panchang 28 September 2024 : आज शनिवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी सिद्ध योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Astrology Panchang 28 September 2024 : आज शनिवार, 28 सप्टेंबर रोजी चंद्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी असून या तिथीला इंदिरा एकादशीचं व्रत केलं जातं. आजच्या दिवशी एकादशी तिथीचे श्राद्ध विधी केले जातात. या दिवशी पितरांच्या नावाने श्राद्ध केल्याने पितरांना यमलोकातून मोक्ष प्राप्त होतो.
आज इंदिरा एकादशीच्या दिवशी सिद्ध योग, साध्ययोग आणि आश्लेषा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ संयोग योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
आजचा म्हणजेच, इंदिरा एकादशीचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. आज तुम्हाला काही नवीन लोक भेटतील, ज्यांचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. आज नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या पूर्वजांच्या आशीर्वादामुळे एखाद्या चांगल्या कंपनीकडून ऑफर मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या पगारात आणि करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. जर तुम्ही कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज तुम्हाला त्यात यश मिळू शकतं. संध्याकाळचा वेळ कुटुंब आणि प्रियजनांसोबत मजेत घालवला जाईल.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. कन्या राशीच्या लोकांचा कल धार्मिक कार्याकडे असेल. जर तुम्ही कोणत्याही समस्येत अडकले असाल, तर आज सर्व विघ्न दूर होतील. नोकरी करणारे आज त्यांचं कार्यालयीन काम मजामस्तीने पूर्ण करतील आणि इतर कोठूनही त्यांना नोकरीची चांगली ऑफर मिळू शकते. तुमच्या लव्ह लाईफमध्ये काही ताणतणाव सुरू असतील तर आज ते दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल आणि यशस्वीही व्हाल. संध्याकाळी तुमच्या आई-वडिलांच्या आशीर्वाद आणि सल्ल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतील.
वृश्चिक रास (Scorpio)
आजचा दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांच्या घरात आज एकादशीमुळे धार्मिक वातावरण असेल आणि त्यांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदीही करता येईल. आज व्यवसायात, एखाद्या ओळखीच्या व्यक्तीद्वारे व्यावसायिक लाभाची परिस्थिती निर्माण होईल आणि तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक सुधारेल. नोकरी करणाऱ्यांना आज कार्यालयातील सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल, त्यामुळे ते वेळेवर काम पूर्ण करू शकतील. आज कुटुंबात श्राद्ध विधी आयोजित केले जाऊ शकतात.
मकर रास (Capricorn)
आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. मकर राशीचे लोक आज आपल्या मुलांना चांगलं काम करताना पाहून आनंदित होतील. एकादशीमुळे पितरांच्या नावाने श्राद्धविधी आणि धर्मादाय कार्य करण्यात रुची वाढेल. व्यावसायिक आपल्या व्यवसायात नवीन परदेशी उत्पादनं समाविष्ट करू शकतात, ज्यामुळे चांगला नफा देखील होईल. त्याच वेळी, नोकरदार लोक आज नवीन नोकरी शोधू शकतात. सामाजिक सेवांशी संबंधित लोकांना आज अनेक संधी मिळतील, ज्यामुळे नफा आणि प्रगती दोन्ही मिळतील. वैवाहिक जीवनात आज राग असेल, पण प्रेम कमी होणार नाही.
मीन रास (Pisces)
आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. मीन राशीच्या लोकांना आज गुंतवणुकीच्या चांगल्या संधी मिळतील आणि पैशामुळे अडकलेली कामं पूर्ण करता येतील. आज एकादशीचं श्राद्ध विधी घरी केलं जाऊ शकतं. या राशीचे विद्यार्थी ज्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे ते आज त्यांचं स्वप्न पूर्ण करू शकतात. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल आणि करिअरमध्ये तुमचं स्थान मजबूत होईल. आज तुम्हाला आजूबाजूच्या लोकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :