एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Astrology : आज अमला योगासह बनले बनले अनेक शुभ योग; मिथुनसह 5 राशींना होणार मोठा लाभ, अनपेक्षित स्रोतांतून पैसे येणार

Panchang 14 October 2024 : आज सोमवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, ऐन सोमवारी अमला योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Panchang 14 October 2024 : आज सोमवार, 14 ऑक्टोबर रोजी चंद्र शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे, तर चंद्रापासून 10व्या घरात शुभ ग्रह, म्हणजेच शुक्राच्या उपस्थितीमुळे अमला योग तयार होत आहे. तसेच आज अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी असून या दिवशी अमला योगासह वृद्धी योग आणि शतभिषा नक्षत्राचा शुभ संयोग असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

मिथुन रास (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. मिथुन राशीच्या लोकांना आज गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल आणि त्यांना सकाळी चांगली बातमी मिळेल. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगती साधू शकाल आणि अधिकाऱ्यांच्या पाठिंब्याने तुम्हाला दिलासा मिळेल. सासरच्या लोकांमध्ये काही गैरसमज चालू असतील तर ते आज संपुष्टात येतील आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. 

कर्क रास (Cancer)

आजचा दिवस कर्क राशीसाठी चांगला असेल. प्रलंबित कामं पूर्ण होतील. जर तुम्ही आज कुठेतरी पैसे गुंतवले तर तुम्हाला भविष्यात दुप्पट नफा मिळेल, ज्यामुळे तुमची भविष्याची चिंता कमी होईल. सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभाग घेतल्याने लोकप्रियता आणि आदर वाढेल. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील आणि नफाही होईल. तुम्हाला प्रत्येक पावलावर भावा-बहिणीची मदत मिळेल, ज्यामुळे घरातील कामं सहज पूर्ण होतील आणि कुटुंबातील सर्व सदस्यांमधील संबंधही चांगले राहतील.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. कन्या राशीच्या लोकांच्या अनेक इच्छा आज महादेवाच्या कृपेने पूर्ण होतील. तुम्हाला संपत्ती आणि वाहन सुख मिळण्याचीही शक्यता आहे. आर्थिक दृष्टीकोनातून दिवस चांगला जाईल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांना त्यांच्या प्रयत्नांमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना आज दुसऱ्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते. कुटुंबात काही तणाव किंवा गैरसमज चालू असतील तर ते आज दूर होतील आणि सर्व सदस्य एकमेकांना कामात मदत करण्यासाठी पुढे येतील.

कुंभ रास (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय शुभ असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना भगवान शंकराच्या कृपेने आज अचानक मोठी रक्कम मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडण्यात यशस्वी व्हाल. व्यावसायिक आज दिवसभर ग्राहकांमध्ये व्यस्त राहतील आणि त्यांना उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील. तुमचं एखादं काम खूप दिवसांपासून प्रलंबित असेल तर ते तुमच्या भावांच्या मदतीने सहज पूर्ण होईल. तसेच या राशीचे लोक ज्यांना परदेशात जायचं आहे, त्यांची इच्छा आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. मीन राशीचे लोक आज त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकतात आणि त्यांना त्यांच्या मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुमचा तुमच्या भावांसोबत काही वाद होत असेल तर तो आज संपेल आणि सर्व प्रकारचे गैरसमजही दूर होतील. नोकरी करणाऱ्यांना आज त्यांच्या सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे ते कार्यालयीन कामे वेळेवर पूर्ण करतील आणि मजेदार मूडमध्ये दिसतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 14 October 2024 : आज सोमवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 21 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागाMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Embed widget