Astrology : आज तुळशी विवाहाबरोबर जुळून आला वेशी योग; 'या' 5 राशींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा, सुख-संपत्तीने असाल समृद्ध
Astrology Panchang 13 November 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ पाच राशीच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
Astrology Panchang 13 November 2024 : आज 13 नोव्हेंबर म्हणजेच बुधवारचा दिवस. आज देशभरात तुळशी विवाह (Tulsi Vivah) साजरा करण्यात येतोय. तसेच, आज कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रदोष तिथी आहे. त्याचबरोबर आजच्या दिवशी बुध प्रदोष व्रत देखील केले जाणार आहे. आजच्या दिवशी रवि योग (Yog), शुभ योग आणि रेवती नक्षत्र असे शुभ संयोग जुळून आले आहेत. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ पाच राशीच्या लोकांना होणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज गणपतीच्या कृपेने तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेले तुमचे काम पूर्ण होईल. त्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल. तसेच, आज कोणाताही गोष्टीचा निर्णय घेताना नीट विचारपूर्वक घ्या. अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप करावा लागू शकतो. आज मित्राबाबत असलेले तुमचे सर्व गैरसमज दूर होतील. आणि तुम्ही पुन्हा चांगले मित्र व्हाल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. आज तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, आज तुम्हाला अचानक धनलाभ देखील होण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला चांगला लाभ मिळेल. आज तुम्ही ज्या क्षेत्रात पैसे गुंतवाल त्यातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना चांगल्या नोकरीची ऑफर मिळू शकते.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुळशीचं लग्न असल्या कारणाने तुमच्या घरात प्रसन्नतेचं वातावरण पाहायला मिळेल. तसेच, आज तुमच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ फार महत्त्वाचा असणार आहे. त्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुमच्या घरात शुभ कार्याचं आयोजन केलं जाऊ शकतं. तसेच, गणपतीचा तुमच्यावर आशीर्वाद असल्या कारणाने तुमची बौद्धिक क्षमता चांगली असेल. आज तुम्ही कोणाच्याच बोलण्यात अडकणार नाहीत. तुमचे निर्णय घ्यायला तुम्ही समर्थ असाल. तसेच, मित्रांच्या साथीने तुम्ही आज बाहेर जाण्याचा प्लॅन देखील करु शकता. एकंदरीत तुमचा आजचा दिवस चांगला असेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी देखील प्रसन्नतेचं वातावरण पाहायला मिळेल. तसेच, कोणताही निर्णय घेण्यासाठी तुम्ही सक्षण असाल. समाजकार्यात तुमचा चांगला सहभाग पाहायला मिळेल. तसेच, आज कोणालाही मदत करताना सावधानता बाळगा अन्यथा तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही काळजी घेण्याची गरज आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: