(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Astrology News : पूजेच्या वेळी नारळ नासका निघणं शुभ की अशुभ? ज्योतिषशास्त्रात नेमकं काय म्हटलंय...
Astrology News : नारळाला सर्व फळांमध्ये सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. त्यामुळेच नारळाला श्रीफळ म्हणतात. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, पूजेच्या वेळी नारळ अर्पण केला जातो आणि तो फोडून तो प्रसादाच्या स्वरूपात खाल्ला जातो.
Astrology News : हिंदू धर्मात पूजा-पाठ व्यतिरिक्त शुभ कार्यासाठी नारळाचा वापर प्रामुख्याने केला जातो. इतकंच नाही तर, नारळाला (Coconut) सर्व फळांमध्ये सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. त्यामुळेच नारळाला श्रीफळ म्हणतात. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, पूजेच्या वेळी नारळ अर्पण केला जातो आणि तो फोडून तो प्रसादाच्या स्वरूपात खाल्ला जातो. पण, पूजेसाठी वापरला जाणारा नारळ फोडल्यानंतर तो खराब निघतो असं अनेकदा होतं. यामुळे लोकांच्या मनात संशय निर्माण होतो. तसेच, याला शुभ-अशुभ परिणामांनी देखील जोडलं जातं. अशा वेळी, पूजेच्या वेळी नारळ खराब निघाला तर त्याचे नेमके कोणते संकेत आहेत ते जाणून घेऊयात.
नारळ खराब निघाला तर...
पूजेच्या वेळी नारळ फोडताना जर नारळ खराब निघाला तर, घाबरून जाऊ नका. हा कोणत्याच पद्धतीने पद्धतीने अशुभ संकेत नाही. याऊलट, असं म्हटलं जातं की, देवाने प्रसाद ग्रहण केला आहे. त्यामुळेच नारळ सुका आहे किंवा खराब निघाला आहे. त्याचबरोबर, देवाने तुमच्या पूजेचा स्वीकार केला आहे आणि तो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल असा देखील याचा अर्थ होतो.
सर्वांना वाटा प्रसाद...
प्रसादाच्या रुपात देवाला दाखवलेला नारळ जर स्वच्छ आणि चांगला निघाला तर तो प्रसाद म्हणून स्रवांना वाटावा. देवाचा प्रसाद जितक्या लोकांना वाटाल तितकं पुण्य तुम्हाला मिळतं असं म्हणतात. पण, एक गोष्ट लक्षात घ्या, की कधीही प्रसादाला खरकट्या हातांनी हात लावू नये तसेच खाऊ नये. यामुळे देव-दैवत नाराज होतात. तसेच, जर पूजेचा प्रसाद शिल्लक राहिला असेल तर तो स्वच्छ भांड्यात ठेवा. जर, चुकून प्रसाद जमिनीवर पडला तर तो पक्ष्यांना खाऊ घाला.
नारळात असते देवी लक्ष्मीची कृपा
हिंदू धर्मशास्त्रात नारळाला श्रीफळ म्हणतात. कारण यामध्ये देवी लक्ष्मीची कृपा असते अशी मान्यता आहे. देवी लक्ष्मीच्या पूजेत विशेषकरून नारळ अर्पित केला जातो. त्याचबरोबर नारळात त्रिदेव म्हणजेच ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो असं म्हणतात. त्यामुळे नारळ नेहमीच शुभ मानला ददत
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :