(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashadh Purnima : 13 जुलैला बनत आहे विशेष योग, 'या' 4 राशींना होणार अचानक धनलाभ! .
Ashadh Purnima : ज्योतिषांच्या मते 13 जुलै ते 16 जुलै या कालावधीत लक्ष्मी नारायण योग चार राशींसाठी खूप शुभ परिणाम देईल.
Lakshmi Narayan Yog : 13 जुलै रोजी सकाळी 10:41 वाजता शुक्र ग्रह मिथुन राशीत प्रवेश करेल. यानंतर 7 ऑगस्टपर्यंत शुक्र ग्रह या राशीत राहील. यापूर्वी 2 जुलै रोजी बुध ग्रहाने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे शुक्र मिथुन राशीत प्रवेश करताच बुध-शुक्र यांच्या संयोगाने लक्ष्मी नारायण योग तयार होईल. ज्योतिषांच्या मते 13 जुलै ते 16 जुलै या कालावधीत लक्ष्मी नारायण योग चार राशींसाठी खूप शुभ परिणाम देईल.
सिंह
या राशीच्या लोकांना या ग्रहांच्या राशी बदलानंतर चांगले पैसे मिळतील. या काळात तुम्ही बचत देखील करू शकाल. यासोबतच तुम्हाला विदेश प्रवासाची संधी मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी काही फायदा होऊ शकतो. नोकरदार लोकांना नवीन संधी मिळू शकतात. तुमची संवाद शैली तुमच्या जीवनात अनेक अनुकूल बदलांची प्रबळ शक्यता निर्माण करेल.
तूळ
बुध-शुक्र यांच्या संयोगामुळे हा लक्ष्मी नारायण योग तूळ राशीच्या लोकांना भाग्याची साथ देईल. या दरम्यान तूळ राशीचे लोक यशाकडे वाटचाल करतील. करिअरच्या नवीन संधी मिळू शकतात. यासोबतच तुम्ही कुटुंब आणि मुलांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. लक्ष्मीनारायण योगात तुम्ही अचानक धनवान होऊ शकता.
कुंभ
13 जुलै रोजी लक्ष्मी नारायण योगाचा शुभ प्रभाव कुंभ राशीच्या लोकांवरही पडेल. कुंभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या राशीचे लोक जे व्यवसायाशी संबंधित आहेत त्यांना शुभ परिणाम मिळतील. तुम्हाला चांगला नफा होईल. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीसाठीही वेळ खूप शुभ आहे. तुम्हाला कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ शुभ आहे.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी बुध आणि शुक्र यांच्या संयोगाने तयार झालेला लक्ष्मी नारायण योग शुभ राहील. विशेषतः जे व्यवसायाशी संबंधित आहेत. वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी येईल. नवीन नोकरी मिळण्याचीही शक्यता आहे. लक्ष्मी नारायण योगामुळे लक्ष्मी देवीची विशेष कृपा राहील आणि तुम्हाला कुठूनतरी अचानक धनप्राप्ती होऊ शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :