Astrology : तूप-गुळाचा उपाय रातोरात बदलेल तुमचं नशीब; बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय
Astrology : असं म्हणतात की, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीचं नाम स्मरण करुन केली तर सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतात.
Astrology : सनातन धर्मानुसार, बुधवारचा दिवस हा भगवान श्री गणेशाला (Lord Ganesh) समर्पित आहे. या दिवशी भगवान गणेशाची पूजा केल्याने तसेच काही ज्योतिषीय उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या समस्यांपासून सुटका होते. हिंदू शास्त्राप्रमाणे, गणपतीला प्रथम पूजनीय मानण्यात आलं आहे.
असं म्हणतात की, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीचं नाम स्मरण करुन केली तर सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतात.
ज्योतिष शास्त्रानुसार, बुधवारच्या दिवशी भगवान गणेशाची पूजा केल्याने कुंडलीतील बुधची स्थिती मजबूत होते. तसेच, व्यक्तीला सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर, व्यक्तीला अशुभ परिणामांपासून मुक्ती मिळते. अशा वेळी बुधवाच्या दिवशी तुम्ही काही उपाय करुन तुमचं नशीब उजळू शकता.
बुधवाच्या दिवशी करा 'हे' उपाय
- ज्योतिष शास्त्रानुसार, बुधवारच्या दिवशी गणपतीला शेंदूर लावल्याने व्यक्तीला शुभ फळ प्राप्त होतात. या दिवशी लाडक्या बाप्पाची आरती करा. त्यांच्या मंत्राचा जप करा. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटं दूर होतील.
- बुधवारच्या दिवशी पूजेच्या थाळीत दूर्वा अर्पण करा. असं म्हणतात की, गणपतीला दूर्वा अर्पण केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतात. तसेच, भक्तांच्या मनातील इच्छा लवकर पूर्ण करतात.
- शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, बुधवारच्या दिवशी बुध ग्रहाची नकारात्मकता दूर करण्यासाठी गणेशाला धूप अर्पण करा. त्यानंतर गणपतीला गूळ अर्पण करा. इतकंच नव्हे तर, शक्य असल्यास गणपतीला मोदक आणि लाडूंचा नैवेद्य अर्पण करा.
- ज्योतिष शास्त्रानुसार, बुधवारच्या दिवशी शमीचं रोप लावा. मान्यतेनुसार, भगवान गणेशाला शमीचं रोप फार प्रिय आहे. असं म्हणतात की, आजच्या दिवशी शमीचं रोप लावल्याने घरात धन-धान्याची कमतरता भासत नाही.
- बुधवारच्या दिवशी गणपतीला घी आणि गुळाचा प्रसाद द्या. ज्योतिष शास्त्रानुसार, या दिवशी हे उपाय केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतात. यामुळे तुमची आर्थिक परिस्थितीपासून लवकरच सुटका होईल.
- इतकंच नव्हे तर, या दिवशी गणपतीच्या पूजेच्या वेळी त्यांना ओले तांदूळ अर्पण करा. यामुळे बाप्पा प्रसन्न होऊन भक्ताला मागेल ती इच्छा पूर्ण करतात. तसेच, आशीर्वाद देतात.
- जर, अधिक काळापासून तुमचं जर काम थांबलं असेल तर ते पूर्ण करण्यासाठी बुधवारच्या दिवशी खिशात हिरवा रुमाल ठेवा. त्याचबरोबर घराबाहेर पडण्याआधी बडीशोप खा. यामुळे तुमची सर्व कार्य सुरळीत पार पडतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :