Astrology : यंदाची दिवाळी अद्भूत, अलौकिक! एकत्र जुळून येणार 4 शुभ योग; 'या' 5 राशींचं बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार
Astrology : ज्योतिष शास्त्रानुसार, यंदाची दिवाळी ही फारच अद्भूत आणि अलौकिक असणार आहे. खरंतर, यंदाच्या दिवाळीकत 4 शुभ राजयोग जुळून आले आहेत.
Astrology : दिवाळीची (Diwali 2024) सुरुवात अगदी धमाकेदार झाली आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, यंदाची दिवाळी ही फारच अद्भूत आणि अलौकिक असणार आहे. खरंतर, यंदाच्या दिवाळीकत 4 शुभ राजयोग (Yog) जुळून आले आहेत. त्यामुळे ही दिवाळी 5 राशीच्या लोकांसाठी फार शुभ असणार आहे.
आज संपूर्ण भारतात दिवाळी साजरी केली जातेय. त्याचबरोबर, यंदाच्या दिवाळीला नवपंचम राजयोग, गुरु-शुक्रसह समसप्तक राजयोग, तसेच, शनी स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत राहून शश राजयोग आणि लक्ष्मी योग जुळून आला आहे. या शुभ राजयोग 5 राशींच्या जीवनावर देवी लक्ष्मीची कृपा असणार आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवाळीला जुळून आलेला शश राजयोग फारच लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमचे जुने वाद-विवाद दूर होतील. तसेच, यशाचे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमचा व्यवसाय देखील सुरळीत चालेल.
मिथुन रास (Gemini Horoscope
यंदाची दिवाळी मिथुन राशीच्या लोकांसाठी फार शुभदायक असणार आहे. तुम्हाला करिअरमध्ये चांगली ऑफर मिळू शकते. तसेच, तुमच्या करिअरमध्ये प्रगतीचे अनेक मार्ग आहेत. या काळात तुम्ही नवी घर, गाडी खरेदी करु शकता. परदेशात जाण्याची चांगली संधी आहे.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी समसप्तक राजयोग फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. नोकरदार वर्गातील लोक आणि व्यापारी वर्गातील लोकांसाठी हा काळ फार महत्त्वाचा असणार आहे. या काळात तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी ही दिवाळी फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. तसेच, तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांना या काळात करिअरच्या अनेक सुवर्णसंधी मिळतील. तसेच, तुमची मानसिक स्थिती फार चांगली असणार आहे. ताणतणावापासून तुम्हाला मुक्ती मिळेल. तसेच, या काळात तुम्ही मागाल ती इच्छा पूर्ण होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :