Ashadhi Ekadashi 2024 : आजपासून देव निद्रावस्थेत, पण 4 महिन्यांत 'या' 5 राशींचं भाग्य उजळणार, धन-संपत्तीत होणार चिक्कार वाढ
Ashadhi Ekadashi 2024 : चार महिन्यात अनेक महत्त्वाच्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे अनेक शुभ योग जुळून येतील. या शुभ योगांचा 5 राशींना करिअर, धनधान्य संपत्तीच्या बाबतीत चांगला लाभ होणार आहे.
Ashadhi Ekadashi 2024 : आज आषाढी एकादशीचा (Ashadhi Ekadashi 2024) शुभ दिवस. इतक्या दिवसांपासून विठुरायाच्या (Lord Vitthal) दर्शनासाठी आतुर झालेले भक्त आज आपल्या दैवताचं दर्शन घेणार. खरंतर, आजपासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पुढचे चार महिने देव निद्रावस्थेत असतील. पण, हा चार महिन्यांचा काळ पाच राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक असणार आहे. या लकी राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
खरंतर, या चार महिन्यात अनेक महत्त्वाच्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे अनेक शुभ योग जुळून येतील. या शुभ योगांचा 5 राशींना करिअर, धनधान्य संपत्तीत, तसेच पद-प्रतिष्ठेच्या बाबतीत चांगला लाभ होणार आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आषाढी एकदशीचा दिवस फार शुभ असणार आहे. तुमच्या सर्व समस्या या काळात दूर होतील. या कालावधीत जोडीदाराचा तुम्हाला चांगला सहवास लाभेल. तसेच, तुमच्या पदोन्नतीतही चांगली वाढ होईल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ फार शुभकारक असणार आहे. या कालावधीत अनेक मार्गातून धनसंपत्ती लाभेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. नात्यात एकता, बंधुत्व, प्रेम जास्त दिसून येईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फार शुभ असणार आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांना या काळात चांगलाच फायदा होणार आहे. तुमच्या मेहनतीला यश मिळेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असून तुमचा बॅंक बॅलेन्सही वाढेल. अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे या काळात पूर्ण होतील.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभदायक असणार आहे. या दरम्यान तुम्हाला अप्रात्यक्षिक मार्गाने धनलाभ होईल. या काळात तुम्हाला पैशांची गुंतवणूक करायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे. नोकरदार वर्गातील लोकांना चांगलं प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला चांगला धनलाभ होईल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. या काळात तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील. गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :