एक्स्प्लोर

Aries July Horoscope 2024 : मेष राशीसाठी जुलै महिना प्रगतीचा; नोकरी-व्यवसाय गाठणार नवी उंची; वाचा मासिक राशीभविष्य

Aries July Horoscope 2024, Monthly Horoscope : जुलै महिना मेष राशीसाठी खूप फलदायी ठरणार आहे, तर काहींना या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

Aries July Horoscope 2024, Monthly Horoscope : मेष राशीच्या लोकांसाठी जुलै महिना चांगला जाणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा महिना त्रासदायक असू शकतो, कारण या महिन्यात व्यवसायात जास्त यश मिळण्याची आशा नाही, परंतु या महिन्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं प्रेम मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही जे स्वप्न बऱ्याच वर्षांपासून पाहत होतात ते आता पूर्ण होताना दिसेल. नोकरदार वर्गासाठी हा महिना लाभदायक असेल, कारण या महिन्यात तुम्ही ऑफिसमधील अनेक प्रलंबित कामं पूर्ण करून तुमच्या बॉसला प्रभावित करणार आहात. हा महिना विद्यार्थ्यांना करिअरमध्ये यश मिळवून देईल. कौटुंबिक दृष्टिकोनातूनही हा काळ आनंदी राहील. मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी जुलै महिना नेमका कसा असणार? या संदर्भात अधिक जाणून घेऊया.

कसा असेल पहिला आठवडा? (Aries July Month Horoscope)

पहिल्या आठवड्यात कामात तुम्ही कुशलता दाखवाल. कितीही ठरवलं तरी विरोधक तुमचं काही बिघडवू शकणार नाहीत. तुमच्या प्रयत्नांना फळ मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित काही गोंधळ होऊ शकतो. भाग्य तुम्हाला साथ देईल. एखाद्याने तुमचं कौतुक केल्याने तुम्हाला आनंद होईल. कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा वाढतील. तुमचे प्रियजन तुम्हाला दुखवू शकतात. नियमित दिनचर्येदरम्यान काळजी घ्या. तुम्हाला नवीन ऑर्डर किंवा व्यवसायात नवीन डील मिळू शकते. करिअरमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. हा महिना तुमच्या आयुष्यातला चांगला टर्निंग पॉईंट ठरेल. तुमची कमाई चांगली होईल. किरकोळ समस्यांना सामोरं जावं लागेल, पण त्याही लवकर निघून जातील. 

कसा असेल दुसरा आठवडा? (Aries July Month Horoscope)

दुसऱ्या आठवड्यात गोड बोलण्याने व्यवसायात चमत्कार घडतील. ग्राहक तुमच्या कामाची प्रशंसा मिळेल. करिअरमध्ये नवीन संधी तुमचं दार ठोठावतील. मालमत्तेतून नफा मिळेल. प्रत्येक गोष्टीवर भाष्य करणं टाळा. थोडे प्रयत्न करून आर्थिक स्थिती मजबूत होईल. कोणावर शंका घेऊ नका, अन्यथा तुम्हाला पश्चाताप होईल. कुटुंबात मतभिन्नता दिसून येईल. स्वतःवरील आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. लोकांना तुमच्या सल्ल्याचा फायदा होईल.

कसा असेल तिसरा आठवडा? (Aries July Month Horoscope)

तिसऱ्या आठवड्यात तुमचा अध्यात्मिक विचारांकडे झुकाव असेल. लव्ह लाईफसाठी हा काळ चांगला नाही. कौटुंबिक वाद टाळा, अन्यथा तणाव वाढू शकतो. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. बुद्धीचा योग्य वापर होईल. गुडघेदुखी, पाठदुखी वाढेल. पालकांशी संबंध अधिक घट्ट होतील. वरिष्ठ सहकारी आणि गुरूचा सल्ला तुम्हाला मदतीचा ठरेल. मित्रासोबत झालेल्या वादामुळे तुम्हाला वाईट वाटेल.  जास्त विचार करणं हानिकारक असू शकतं, म्हणून ते टाळा. अचानक प्रवास होण्याचीही शक्यता आहे.

कसा असेल चौथा आठवडा? (Aries July Month Horoscope)

चौथ्या आठवड्यात आर्थिक लाभ होण्याची चिन्हं आहेत. तुमचं जीवन सर्वसाधारणपणे आनंदी असेल. पालकांशी संबंधात गोडवा येईल. करिअरसाठी हा काळ चांगला आहे. नवीन संपर्क प्रस्थापित होतील. प्रेमसंबंधांसाठी वेळ मध्यम ते उत्तम आहे. जोडीदाराच्या प्रेमामुळे मन भावूक राहील, परंतु काही ठिकाणी वैचारिक मतभेदांमुळे चिडचिड होईल. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. राग टाळा. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे. आईकडून पूर्ण सहकार्य मिळेल. पाठ आणि कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Monthly Horoscope July 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी जुलै महिना कसा राहील? मासिक राशीभविष्य जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 14 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी 'ही' गोष्ट आवर्जून करा
14 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी 'ही' गोष्ट आवर्जून करा
Shravan 2026 : श्रावणात उपवास का करतात? श्रावणी सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा A to Z माहिती...
श्रावणात उपवास का करतात? श्रावणी सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा A to Z माहिती...
Chandra Grahan 2026: सूर्यग्रहणानंतर आता रक्षाबंधनच्या दिवशी 'चंद्रग्रहणाचं' सावट? कधी सुरू होणार ग्रहण? सूतक काळ लागू असेल? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
सूर्यग्रहणानंतर आता रक्षाबंधनच्या दिवशी 'चंद्रग्रहणाचं' सावट? कधी सुरू होणार ग्रहण? सूतक काळ लागू असेल? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Shravan 2026: यंदा पहिला श्रावणी सोमवार - नागपंचमी एकत्रच! आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
यंदा पहिला श्रावणी सोमवार - नागपंचमी एकत्रच! आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget