एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 29th March 2023 : मेष राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन सुखी होईल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Aries Horoscope Today 29th March 2023 : आज तुम्हाला घरच्या कामात मुलांचं सहकार्य मिळेल. मुले घरातील कामे हाताळण्यास मदत करतील.

Aries Horoscope Today 29th March 2023 मेष राशीच्या  (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे. तुम्हाला मोठा फायदा होण्याचे संकेत आहेत. आर्थिक स्थितीत बळ येईल. कौटुंबिक जीवन आनंदी राहिल. तुमच्या जोडीदारासोबत (Life Partner) तुम्ही कुटुंबाच्या कल्याणासाठी काम करताना दिसाल. भावाच्या लग्नात येणारे अडथळे ओळखीच्या व्यक्तीमुळे संपतील, त्यामुळे कुटुंबात (Family) शुभ कार्यक्रम आयोजित होतील. प्रत्येकजण पुढे जाऊन काम करताना दिसेल. नोकरदार (Employees) लोकांना त्यांच्या नोकरीत दिलेली कामे पूर्ण प्रामाणिकपणे करावी लागतील. अधिकार्‍यांशी बोलताना तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवा. व्यवसायात बदलाची संधी मिळू शकते. जे तुमच्या व्यवसायाला खूप पुढे नेतील. 

मुलांचं सहकार्य मिळेल

आज तुम्हाला घरच्या कामात मुलांचं सहकार्य मिळेल. मुले घरातील कामे हाताळण्यास मदत करतील. कोणतेही रखडलेले पैसे मिळू शकतात. जर तुम्ही आधी काही गुंतवणूक केली असेल तर त्याचाही पूर्ण फायदा होईल. विद्यार्थी (Students) मोठ्या मनाने परीक्षेची तयारी करताना दिसतील. स्पर्धेसाठी विद्यार्थीही मेहनत घेतील. शिक्षकांचीही (Teachers) मदत घेतली जाईल. मुलांच्या भविष्यासाठी पालक पैसे गुंतवतील.

वाणीवर नियंत्रण ठेवा

मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आज तुम्ही कुटुंबियांसोबत जास्त वेळ घालवण्याचा विचार करा, ज्यामुळे तुमचे कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल. विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचा टप्पा सुरु आहे, त्यामुळे तुमच्या परीक्षेकडे अधिक लक्ष देणं योग्य ठरेल. काही कारणास्तव आज तुम्हाला स्वतःच्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणतीही किरकोळ समस्या तुम्हाला तणावात आणू शकते, त्यामुळे सावधगिरी बाळगा.

आज मेष राशीचे आरोग्य 

आज सर्दी किंवा इतर कारणामुळे छातीत दुखू शकते. हृदयरोग्यांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे औषध आणि आहाराच्या बाबतीत गाफील राहू नका.

मेष राशीसाठी आज उपाय 

हनुमान चालिसाचे पठण करा. संध्याकाळी ईशान्येला गायीच्या तुपाचा दिवा लावावा.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 29th March 2023 : वृषभ, तूळ, कुंभ राशीच्या लोकांनी 'या' गोष्टींपासून थोडे सावध राहावे; जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
Horoscope Today 1 August 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 1 August 2026: ऑगस्टचा पहिलाच दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
ऑगस्टचा पहिलाच दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Embed widget