एक्स्प्लोर

Aquarius Horoscope Today 24 October 2023: कुंभ राशीसाठी आजचा दिवस त्रासदायक, वादाची शक्यता; आजचं राशीभविष्य

Aquarius Horoscope 24 October 2023: कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही समस्या वाढताना दिसतील, ज्या हाताळण्यासाठी तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागेल.

Aquarius Horoscope Today 24 October 2023: कुंभ राशीच्या (Aquarius  Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) थोडा त्रासदायक असेल. आज तुमच्या जीवनात काही वाद निर्माण होऊ शकतात आणि तुमचा गोंधळ उडू शकतो. कुंभ राशीच्या लोकांनी आज पैशांच्या देवाणघेवाणीची कामं करू नये. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ तर मिळेलच, पण एखाद्या गोष्टीवरुन तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये खटके उडू शकतात. पण दिवसाच्या शेवटी सर्व गोष्टी सुरळीत देखील होतील. सामाजिक जीवनात आज तुमची उंची वाढेल, लोक तुम्हाला जास्त मानतील. कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे.

कुंभ राशीचं आजचं व्यावसायिक जीवन

व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर आज तुम्ही व्यवसायाशी संबंधित काम करताना काळजी बाळगावी. कोणताही निर्णय घेताना त्यावर एकदा विचार करावा, अन्यथा नुकसान होऊ शकतं.

कुंभ राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

तुमच्या कुटुंबातील नातेसंबंध आज जरा घट्ट ठेवावेत. कोणत्याही प्रकारच्या गोष्टीवरुन आज तुमचे तुमच्या जोडीदाराशी वाद होऊ शकतात आणि तुमचं नातं विस्कळीत होऊ शकतं. आज तुमच्या आयुष्यात काही समस्या वाढताना दिसतील, ज्या हाताळण्यासाठी तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागेल. तुमच्या मुलांच्या भवितव्याची तुम्हाला थोडी काळजी वाटेल. तुम्ही तुमच्या कुटुंबात कोणत्याही प्रकारचा वाद टाळावा, अन्यथा समोरची व्यक्ती तुमचा अपमान करू शकते. म्हणूनच कोणाशीही बोलण्यापूर्वी आज शंभर वेळा विचार केला पाहिजे.

कुंभ राशीचं आजचं आरोग्य

कुंभ राशीच्या लोकांनी आज त्यांच्या आरोग्याबाबत अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे, अन्यथा काही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात आणि तुम्हाला त्याची जाणीवही होणार नाही. आज अंगाच्या डाव्या बाजूच्या अवयवांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. वाहन चालवताना सावधगिरी बाळगण्याचा प्रयत्न करा अन्यथा तुम्हाला शारीरिक दुखापत होऊ शकते आणि डॉक्टरकडे जावं लागू शकतं. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या.

कुंभ राशीसाठी आजचे उपाय

आजचा दिवस चांगला जावा यासाठी दिवसाची सुरुवात करण्याआधी गुळाचं सेवन करा. गूळ खाऊनच घरातून बाहेर पडा, यामुळे तुमचा दिवस नक्कीच चांगला जाईल.

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग मरुन आहे. आज मरुन रंग तुमच्यासाठी खूप शुभ राहील. आज तुमच्यासाठी 3 हा लकी नंबर असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Weekly Horoscope 23-31 oct 2023 : महानवमीपासून सुरू होणारा आठवडा 4 राशींसाठी भाग्याचा! आनंदाची बातमी मिळेल

महत्त्वाच्या बातम्या

Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
Embed widget