Angarak Yog 2022 : अंगारक योगामुळे 'या' राशीच्या लोकांचे होते नुकसान
Angarak Yog 2022 : राहू आणि मंगळ हे अशुभ ग्रह संयोगाने असतात तेव्हा अंगारक योग तयार होतो. हा संयोग सध्या मेष राशीत आहे.
Angarak Yog 2022 : अंगारक योग हा ज्योतिषशास्त्रात धोकादायक योग मानला जातो. राहू आणि मंगळ हे अशुभ ग्रह संयोगाने असतात तेव्हा अंगारक योग तयार होतो. हा संयोग सध्या मेष राशीत आहे. मेष राशीत तयार झालेला अंगारक योग सर्व राशीच्या लोकांवर प्रभाव टाकेल. परंतु या राशीच्या लोकांनी यावेळी खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
अंगारक योग किती काळ आहे?
मेष राशीत अंगारक योग 27 जून रोजी तयार झाला. हा धोकादायक योग 10 ऑगस्ट 2022 पर्यंत राहील. विशेष म्हणजे यावेळी क्रूर ग्रह शनिची तिसरी दृष्टी मेष राशीवर राहते. त्यामुळे अंगारक योगाचा प्रभाव वाढतो. शनीची तिसरी दृष्टी 12 जुलै 2022 पर्यंत मेष राशीवर राहील.
2 ऑगस्ट 2022 रोजी राहू आणि मंगळ सर्वात जवळ येतील. मेष राशीत तयार झालेल्या अंगारक योगात, ग्रहांचा सेनापती राहु आणि मंगळ हे पाप ग्रह सर्वात जवळ येतील. या काळात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
कुंडली
वृषभ : वृषभ राशीच्या लोकांनी 10 ऑगस्ट 2022 पर्यंत संयम ठेवावा लागेल. वाणीतील दोषांमुळे संबंध बिघडू शकतात. शत्रू सक्रिय होऊ शकतात. नोकरीत त्रास होऊ शकतो.
कन्या : कन्या राशीच्या लोकांना पैसा आणि आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. महत्त्वाच्या कामात निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते. नातेसंबंध प्रभावित होऊ शकतात. या काळात वाद टाळण्याचा प्रयत्न करा.
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांना प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कोणाचाही अनादर करू नका. वैवाहिक जीवनातही अडचणी येऊ शकतात.
मीन : मीन राशीच्या लोकांनी खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. या काळात अनावश्यक गोष्टींवर पैसा खर्च होऊ शकतो. वादात पडू नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :