एक्स्प्लोर

Horoscope Today, May 20,2022: मिथुन, धनुसह ‘या’ राशींना येणार विवाहाचे प्रस्ताव! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today , May 20, 2022 : मेष, सिंह राशीच्या लोकांना आज कोणतेही काम करताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. वृश्चिक, धनुसह अनेक राशींची नोकरीत प्रगती होणार आहे.

Horoscope Today , May 20, 2022 : आज उत्तराषाद नक्षत्र आणि चंद्र धनु राशीत आहे, सकाळी 08:45 नंतर चंद्र मकर राशीत जाईल. गुरु मीन राशीत आहे. मेष, सिंह राशीच्या लोकांना आज कोणतेही काम करताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. वृश्चिक, धनुसह अनेक राशींची नोकरीत प्रगती होणार आहे. जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आज पाप ग्रह राहूची दृष्टी मेष राशीवर राहते. आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. दात आणि कानाच्या समस्यांमुळे आरोग्यासंबंधी काही समस्या उद्भवू शकतात. परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांना आज अत्यंत सावधगिरीने निर्णय घ्यावा लागेल. भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका. आज तुम्हाला मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते.

वृषभ (Taurus Horoscope) : पाप ग्रह केतूची सावली या राशीवर पडत आहे. आज मानसिक तणाव किंवा गोंधळाची स्थिती असू शकते. कुटुंबात धार्मिक कार्य होऊ शकते. मित्रांचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमच्या गोड वागण्यामुळे व्यवसायात फायदा होईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. व्यावसायिक दृष्टिकोनातून काहीतरी चांगले घडेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होत राहतील.

मिथुन (Gemini Horoscope) : प्रेमी युगुलांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. तुम्हाला लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. घरात पाहुण्यांची चलबिचल राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. एकामागून एक सर्व कामे पूर्ण होतील. प्रगतीचे नवीन मार्गही दिसतील. वरिष्ठांच्या सहकार्याने पदोन्नतीची संधी मिळू शकते.

कर्क (Cancer Horoscope) : अनेक दिवसांपासून सुरू असलेला कौटुंबिक त्रास आज दूर होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. ऑफिसमध्ये काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर येऊ शकतात. विद्यार्थ्यांना आज अभ्यासात जास्त मेहनत करावी लागेल. आज शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात. अचानक आर्थिक लाभामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबासोबत खरेदीला जाता येईल. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी.

सिंह (Leo Horoscope) : आज तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. व्यर्थ धावपळ होईल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा आर्थिक परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो. त्रयस्थ व्यक्तीमुळे प्रेमसंबंध बिघडू शकतात. व्यवसायात मेहनतीनुसार फायदा होईल. मित्रासोबत कुठेतरी जाण्याचा प्लॅन बनवू शकता. आज तुम्हाला तुमच्या जीवनसाथीकडून काही सुखद बातमी मिळू शकते.

कन्या (Virgo Horoscope) : आज तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल आणि यामुळेच तुम्ही ऑफिसमध्ये अनेक दिवसांपासून रखडलेली कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जर, तुम्ही मुलाखतीसाठी जात असाल, तर तुम्हाला यश मिळू शकते. धनलाभ संभवतो. व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

तूळ (Libra Horoscope) : व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करा. जुने वाद मिटतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज काही चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या कर्तृत्वाने अनेक लोक प्रभावित होतील. समाजात तुमचा सन्मान होऊ शकतो. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. अनावश्यक वाद टाळलेलेच बरे. आज आर्थिक बाजू मजबूत असेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : कार्यालयीन कामे पूर्ण करण्यात काही अडथळे येतील, परंतु सहकाऱ्याच्या मदतीने अडचणी दूर होतील. आज कुटुंबात पार्टी आयोजित केल्याने सर्व सदस्यांमध्ये सुसंवाद राहील. काही नवीन काम सुरू करणार असाल, तर प्रथम आपल्या पालकांचे मत घेणे योग्य ठरेल. उधार घेतलेले पैसे मिळू शकतात. व्यवसायात नवीन गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. नोकरीत प्रगतीची संधी आहे.

धनु (Sagittarius Horoscope) : आज तुम्ही सावध राहण्याची गरज आहे, गोपनीय गोष्टी कोणाशीही शेअर करू नका, विश्वासघात होऊ शकतो. वडिलांकडून आर्थिक सहकार्य मिळेल. नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता. कुटुंबात प्रेम वाढेल. एखाद्या कामासाठी मित्राच्या घरी जाऊ शकता. या राशीच्या अविवाहित लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे, लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

मकर (Capricorn Horoscope) : मन स्थिर राहील. ऑफिसमध्ये आज तुमची कामगिरी चांगली राहील. तसेच, वरिष्ठ तुमच्या कामावर खूश झाल्यानंतर काही भेट देऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात. आर्थिक स्थितीत बरीच सुधारणा होईल. अध्यात्मिक कार्यात रुची राहील. व्यवसायात अपेक्षेप्रमाणे लाभ होईल. वाद टाळण्यासाठी रागावर नियंत्रण ठेवा.

कुंभ (Aquarius Horoscope) : आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. अनावश्यक खर्च टाळा. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांना आज काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या जोडीदाराला नक्की विचारा. पैसे कमावण्याच्या संधी मिळू शकतात. सुख मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य असेल.

मीन (Pisces Horoscope) : आज तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. अचानक आर्थिक लाभामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात सामान्य लाभ होईल. दूरच्या नातेवाईकाच्या आगमनाने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. बाहेर जेवायला जाण्याचा प्लॅनही बनवू शकता. प्रगतीचे नवीन मार्ग खुले होताना दिसतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget