Aditya Mangal Yog 2025: दिवाळीपूर्वी 'या' 3 राशींना लागणार जॅकपॉट! जबरदस्त आदित्य मंगल योग तुमची तिजोरी भरतील, श्रीमंतीचे योग?
Aditya Mangal Yog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, दिवाळीपूर्वी ग्रहांचा असा शक्तिशाली राजयोग तयार होतोय, जो 3 राशींसाठी खूप शुभ आहे. हा राजयोग अनेक लोकांच्या जीवनात संपत्ती, वैभव आणि आनंद घेऊन येईल.

Aditya Mangal Yog 2025: गणेशोत्सव संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत, त्यानंतर नवरात्री सुरू होईल, आणि मग दिवाळी.. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा दिवाळीचा सण अत्यंत खास आहे. कारण ऑक्टोबर महिन्यात असे ग्रह संक्रमण करत आहेत, जे देवी लक्ष्मीचे अपार आशीर्वाद घेऊन येतील. 20 ऑक्टोबर 2025 रोजी दिवाळीपूर्वी असा शक्तिशाली राजयोग तयार होत आहे, जो या 3 राशींसाठी अत्यंत शुभ आहे.
दिवाळीपूर्वी 'या' 3 राशी श्रीमंत होण्याचे संकेत...
ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षी दिवाळी 20 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल आणि त्याच रात्री माता लक्ष्मी, धन कुबेरची पूजा केली जाईल. पण आनंदाची बातमी अशी आहे की दिवाळीपूर्वी आदित्य मंगल राजयोग तयार होत आहे, ज्यामुळे 3 राशी श्रीमंत होतील. सूर्य आणि मंगळाच्या युतीने निर्माण झालेला आदित्य मंगल राजयोग अनेक लोकांच्या जीवनात अपार संपत्ती, वैभव आणि आनंद घेऊन येईल.
तुळ राशीत राजयोग तयार होईल
ज्योतिषशास्त्रानुसार, 13 ऑक्टोबर रोजी मंगळ तूळ राशीत प्रवेश करेल, त्यानंतर 4 दिवसांनी म्हणजेच 17 ऑक्टोबर रोजी ग्रहांचा राजा सूर्यही तूळ राशीत येईल. यामुळे सूर्य आणि मंगळाचा युती होईल, ज्यामुळे आदित्य मंगल राजयोग निर्माण होईल. हा राजयोग 3 राशींच्या लोकांसाठी खूप शुभ राहील.
मेष
ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे आणि मंगळ आणि सूर्याच्या युतीमुळे निर्माण होणारा आदित्य मंगल राजयोग या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. प्रलंबित कामे पूर्ण होतील. व्यवसायिकांसाठी हा काळ विशेषतः शुभ आहे. भरपूर उत्पन्न मिळेल. कार्यक्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंद राहील.
वृषभ
ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ आणि सूर्याच्या युतीमुळे निर्माण होणारा आदित्य मंगल योग वृषभ राशीच्या लोकांनाही फायदेशीर ठरेल. परीक्षा, मुलाखती, वादग्रस्त बाबींमध्ये निकाल तुमच्या बाजूने लागतील. जुने आजार बरे होतील. तुम्हाला नवीन नोकरी मिळेल. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला मोठे यश मिळू शकेल. तुम्हाला प्रत्येक कामात नशीब मिळेल.
तुळ
ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ आणि रवि तूळ राशीत युती करत आहेत, त्यामुळे आदित्य मंगल राजयोग तयार होत आहे. या राशीच्या लोकांना सर्वाधिक फायदा होईल. प्रलंबित पैसे मिळाल्याने बँक बॅलन्स वाढेल. नवीन स्रोतांमधून उत्पन्न मिळेल. तुम्ही लांब प्रवासाला जाऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल.
हेही वाचा :
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी सप्टेंबरचा दुसरा आठवडा कसा असणार? धनलाभ कोणाला? साप्ताहिक राशीभविष्य वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















