एक्स्प्लोर

Weather Update : मराठवाड्यात शनिवारी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार

Marathwada Rain Update: मराठवाड्यातील काही जिल्ह्यात शनिवारी तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Marathwada Rain Update : जून महिन्यातील अर्धा महिना उलटला असताना अजूनही मराठवाड्यातील (Marathwada) अनेक भागात पावसाने (Rain) पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले आहेत. अशातच शेतकऱ्यांना दिलास देणारी बातमी समोर आली आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात शनिवारी (17 जून) तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सोबत वादळी वारा देखील असणार आहे. हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तवला आहे. 

मराठवाड्यातील नांदेड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात शनिवारी तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30  ते 40  कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवसांत कमाल तापमानात तफावत जाणवणार नाही. मराठवाड्यात 16 ते 22 जूनदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी व कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिल. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, असा सल्ला वनामकृवि ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राने दिला आहे.

शेतकऱ्यांचे पावसाकडे लक्ष

खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, आता शेतकऱ्यांचे लक्ष आता पावसाकडे लागले आहेत. मात्र 7 जून उलटून देखील प्रतीक्षेत असलेला पाऊस काही पडताना दिसत नाही. त्यामुळे आता मराठवाड्यातील शेतकरी आता पावसाची वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे विभागातील शेतीच्या मशागती देखील पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे पाऊस पडताच पेरण्यांना सुरुवात होणार आहे. तर हवामान विभागाने वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजानुसार आता शेतकऱ्यांचे देखील लक्ष त्याकडे लागले आहे. 

पेरण्यांची घाई करु नका

दरम्यान मराठवाड्यात काही भागात दोन दिवसांपूर्वी तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी पेरणी देखील सुरु केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या अशी कोणतीही घाई करु नये असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहेत. सोबतच योग्य पाऊस झाल्यावरच पेरण्या कराव्यात असे आवाहन देखील करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या तुरळक पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरणी करणे योग्य राहणार नाही. 

शेतकऱ्यांची फसवणूक 

शेतकरी पावसाची आस लावून बसला असून, यासाठी शेतकरी बी-बियाणे खरेदी करत आहेत. दरम्यान याचा फायदा घेत अनेक ठिकाणी कृषी सेवा केंद्र चालकांकडून लुटमार करण्यात येत आहे. 853 रुपयांची कापसाच्या बियाणाची बॅग 1200 ते 2300 रुपयांपर्यंत विकली जात आहे. आधीच गेल्या वर्षी कापसाला भाव मिळाला नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा कापूस अजूनही घरात पडून आहे. त्यातच आता पुन्हा कापूस लावायचा म्हटल्यावर बियाण्यांपासूनच लुटमार सुरु झाली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Monsoon Update : मुंबई, ठाण्यासह कोकणात पावसाची हजेरी; चक्रीवादळामुळे काही भागात उकाड्यापासून दिलासा, विदर्भाची प्रतिक्षा कायम

महत्त्वाच्या बातम्या

साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
रक्षाबंधनला शेतकऱ्यांना खरंच 4000 रुपये मिळणार का? दाव्यामागं नेमकं काय आहे वास्तव, जाणून घ्या सविस्तर माहिती
रक्षाबंधनला शेतकऱ्यांना खरंच 4000 रुपये मिळणार का? दाव्यामागं नेमकं काय आहे वास्तव, जाणून घ्या सविस्तर माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget