तेलंगणात काँग्रेस सरकारनं कर्जमाफीचा निर्णय घेतला, महाराष्ट्रातही कर्जमाफी व्हावी, किसान सभेची मागणी
तेलंगणात काँग्रेस सरकारने (Telangana Congress government) शेतकऱ्यांची (Farmers) कर्जमाफीचा करण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रात (Maharashtra) देखील कर्जमाफी व्हावी, अशी आमची मागणी किसान सभेनं केलीय.
Kisan Sabha News : तेलंगणामध्ये काँग्रेस सरकारने (Telangana Congress government) शेतकऱ्यांची (Farmers) कर्जमाफीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) देखील कर्जमाफी व्हावी, अशी आमची मागणी असल्याचे वक्तव्य किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले (Ajit Nawale) यांनी केलं आहे. याआधी कर्जमाफी करण्यात आली मात्र, त्यात अटी शर्ती इतक्या लागू केल्या की लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. त्यामुळं आता जर सरकार कर्जमाफी करणार असेल तर अटी शर्तींच्या बाबतीत सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांची फसवणूक करु नये असे अजित नवले म्हणाले.
40 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी
तेलंगणामधील काँग्रेस सरकारने 40 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री रेवंथा रेड्डी यांनी 31 हजार कोटींच्या शेती कर्जमाफीला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याची घोषणा काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिली होती. त्याप्रमाणं सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. तेलंगणा मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. यात 34 हजार कोटी रुपयांच्या कृषी कर्ज माफीस मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. 15 ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज सरकार माफ करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी दिले आहे.
शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सरकारनं चांगली योजना राबवावी
तेलंगणा सरकारने 34 हजार कोटींची कर्जमाफी केली आहे. राज्यात शेतकरी संपानंतर आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर दोन वेळा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली होती. मात्र, अटी शर्तींमुळं अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. नियमित कर्ज भरणारे शेतकरी देखील प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित असल्याचे अजित नवले म्हणाले. लोकसभा निवडणुकीत त्याचे प्रतिबिंब उमटल्याचे नवले म्हणाले. आता पुन्हा एकदा राज्य सरकार शेतकरी कर्जमाफी करणार अशी चर्चा सुरू आहे. मागील दोन कर्जमाफीच्या वेळी झालेला घोळ पाहता अगोदरच्या कर्जमाफीत पात्र शेतकऱ्यांचा आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांचा शेतकऱ्यांचा प्राधान्याने विचार करावा असे नवले म्हणाले. जे अपात्र ठरले त्या त्रूटी दूर कराव्यात. तसेच कर्जमाफीची नुसती घोषणा करु नये, तर त्याची अंमलबजावणी करावी असे नवले म्हणाले. सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या या महाराष्ट्रात होतात, शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी एक उत्तम आणि चांगल्या पद्धतीची कर्जमाफीची योजना राज्य सरकारने राबवावी असे अजित नवले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: