एक्स्प्लोर

Ravikant Tupkar : सोयाबीन-कापूस प्रश्नी निर्णय घ्या अन्यथा, 16जूनला मुंबईच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीवरुन उड्या मारु, स्वाभिमानीचा इशारा  

सोयाबीन (Soybean) आणि कापूस (Cotton)उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Saghtana) पुन्हा आक्रमक झाली आहे

Agriculture News : सोयाबीन (Soybean) आणि कापूस (Cotton)उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Saghtana) पुन्हा आक्रमक झाली आहे. येत्या 15 जूनपर्यंत यासंदर्भात निर्णय घ्या अन्यथा, 16 जूनला मुंबईच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीवरुन उड्या मारु असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला आहे. यामध्ये जर शेतकर्‍यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असा इशाराही तुपकरांनी दिला आहे. .

अद्यापही अनेक शेतकरी पिक विम्यापासून वंचित

सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत आहे. तुटपुंज्या मिळणाऱ्या बाजारभावामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच AIC या पिकविमा कंपनीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पिकविमा दिला नाही. तसेच अतिवृष्टीची मदतही मोठया प्रमाणात शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचे रविकांत तुपकरांनी म्हटलं आहे. बी-बियाणे, खतांच्या बाबतीतही शेतकऱ्यांची फसवणूक चालू आहे. हे सगळं आता थांबायला पाहिजे असे तुपकर म्हणाले. 

शेतकर्‍यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास सरकार जबाबदार

जर सरकारने 15 जूनपर्यंत सोयाबीन आणि कापसाच्या भावासंदर्भात ठोस निर्णय घेतला नाही. अतिवृष्टीच्या नुकसानीची मदत तातडीने मिळाली नाही तसेच  AIC कंपनीने उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविम्याची रक्कम जमा केली नाही. तर आम्ही शेतकऱ्यांसह 16 जूनला मुंबईतील AIC कंपनीच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीमधील 20 व्या मजल्यावर असणाऱ्या कार्यालयावरुन खाली उड्या मारू असा इशारा तुपकरांनी दिला आहे. जर शेतकर्‍यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असंही तुपकरांनी म्हटलंय.

सोयाबीन, कापूस आणि ऊसप्रश्नी रविकांत तुपकर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. खासगी बाजारात सोयाबीनचा भाव प्रति क्विंटल 8,500 रुपये तसेच कापसाचा भाव प्रति क्विंटल12,500 रुपये स्थिर राहावा यासाठी सरकारने धोरण आखावं, यासह इतर मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. शेतकरी प्रश्नावरुन रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन देखील केले होते. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांसह त्यांनी मुंबईत अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा देखील तुपकरांनी दिला होता. त्यानंतर त्यांच्या मुंबईच्या आंदोलनाची सरकारने दखल घेत त्यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, अद्यापही मागण्या सरकारनं मान्य केल्या नसल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Buldhana : पीक विम्याच्या मुद्यावरुन स्वाभिमानी आक्रमक, बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कार्यालयात धडक; प्रश्न मार्गी लावा अन्यथा.... 

 

महत्त्वाच्या बातम्या

कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
रक्षाबंधनला शेतकऱ्यांना खरंच 4000 रुपये मिळणार का? दाव्यामागं नेमकं काय आहे वास्तव, जाणून घ्या सविस्तर माहिती
रक्षाबंधनला शेतकऱ्यांना खरंच 4000 रुपये मिळणार का? दाव्यामागं नेमकं काय आहे वास्तव, जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
Embed widget