एक्स्प्लोर

Sharad Pawar : ज्यावेळी शेतकऱ्यांना संधी मिळते, त्यावेळी सरकारची नियत बदलते, शरद पवारांचा निशाणा

ज्यावेळी शेतकऱ्यांना संधी मिळते त्यावेळी सरकारची नियत बदलते, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

Sharad Pawar : ब्राझिलमध्ये दुष्काळ आहे, त्यामुळं साखरेची मागणी वाढली आहे. मात्र ज्यावेळी शेतकऱ्यांना संधी मिळते, अशावेळेस ज्याच्या हातात सत्ता आहे त्यांनी निर्यात बंदी केली असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. ज्यावेळी शेतकऱ्यांना संधी मिळते त्यावेळी सरकारची नियत बदलते. या देशातील शेतकऱ्यांना परदेशात साखर निर्यात करण्याची संधी होती. अशातच सरकारनं साखर निर्यातबंदी आणि गहू निर्यातबंदी केली  आहे, असे म्हणत पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा लगावला.

परदेशात साखर, गहू निर्यात करून शेतकऱ्यांच्या हाती दोन पैसे मिळाले असते. पण ज्यांच्या हातात सत्ता त्यांनी निर्यात बंदी घातली असं म्हणत शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टीलरी, इथेनॉल प्रकल्पाचा शुभारंभ शरद पवार यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी "महाराष्ट्रातील विधान मंडळातील बबनराव ढाकणे" या संपादीत ग्रंथाचे प्रकाशन देखील पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पुढे बोलताना पवार म्हणाले की, फक्त साखर एके साखर हे दिवस आता राहिले नाहीत, साखरेसोबत इथेनॉल, अल्कोहोल निर्मिती प्रकल्प कारखान्यांनी सुरू करणं गरजेचं आहे. केदारेश्वरच्या या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाला दोन पैसे अधिक मिळेल. प्रतापराव ढाकणे यांनी हाती घेतलेला हा प्रकल्प नक्कीच या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल असं पवार म्हणाले. आज साखर धंदा वेगळ्या वळणार आहे. देशातील शेतकऱ्यांना परदेशात साखर निर्यात करण्याची चांगली संधी होती. अशातच सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतला. तसेच गव्हाची निर्यात करण्याचाही निर्णय घेतल्याचे पवार म्हणाले. हे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. हा प्रश्न सरकार दरबारी मांडू असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

साखरेच्या संदर्भातील निर्णय

केंद्र सरकारने साखर निर्यातीच्या बाबतीत महत्वाचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने गव्हापाठोपाठ साखर निर्यातीच्या संदर्भात एक निर्णय घेतला आहे. भारत सरकारची विशेष परवानगी असेल तरच बंदी काळात संबंधित देशात साखरेची निर्यात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. निर्याती संदर्भातील हा निर्णय 1 जून 2022 पासून लागू होणार आहे. आता 1 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत साखर निर्यातीसाठी सरकारची परवानगी आवश्यक असणार आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयावर विविध संघटनासह राजकीय नेते टीका करत आहेत.
 
गव्हाच्या संदर्भातील निर्णय

देशांतर्गत बाजारात गव्हाच्या किंमतीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर सशर्त बंदी घातली आहे. देशांतर्गत बाजारात गव्हाच्या वाढलेल्या किंमतीमुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. देशाची एकूण अन्न सुरक्षेचं व्यवस्थापन करण्यासाठी आणि शेजारी तसेच इतर असुरक्षित देशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. भारत सरकार शेजारी आणि इतर असुरक्षित विकसनशील देशांच्या अन्न सुरक्षा गरजा पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे सरकारने म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Shetkari Microfinance vs Bank Loan : सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
Chandrashekhar Bawankule: 'मायक्रो फायनान्स'चा हैदोस या राज्यात चालणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सज्जड दम देत इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना थेट कारवाईच्या सूचना
'मायक्रो फायनान्स'चा हैदोस या राज्यात चालणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सज्जड दम देत इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना थेट गुन्हा दाखल करण्याच्या सूचना
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
Akola: दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? अकोल्यात कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...
दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget