एक्स्प्लोर

Rice and Pulses Festival : तांदूळ, डाळ महोत्सवाला पुणेकरांचा प्रतिसाद, सेंद्रीय तांदळाला मोठी मागणी

पुण्यात दोन दिवसीय तांदूळ व डाळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवात एकूण 4 लाख 3 हजार 200 रुपयांची विक्रीची उलाढाल झाली आहे.

Rice and Pulses Festival : पुणे जिल्हा परिषद  आणि उस्मानाबाद जिल्हा परिषद तसेच पुणे आणि उस्मानाबाद जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय तांदूळ व डाळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवात एकूण 4 लाख 3 हजार 200 रुपयांची विक्रीची उलाढाल झाली आहे. पुणेकरांनी या महोत्सवात तांदूळ आणि डाळी खरेदीला चांगली पसंती दिली असल्याची माहिती पुणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू यांनी दिली. 

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत महिला स्वयंसहायता समूहातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, तसेच त्यांची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता. यामध्ये पुणे जिल्हा परिषद आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदेनं पुढाकार घेतला होता. याला पुणेकरांनी चांगली प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. 

सेंद्रीय तांदळाला मागणी

महोत्सवामध्ये सेंद्रीय पद्धतीनं उत्पादित केलेला इंद्रायणी तांदूळ, आंबेमोहोर, कोलम, काळा तांदूळ, काळा गहू आणि उडीद, मटकी, मूग, हरभरा, तूर डाळ व  राजमा विक्रीस ठेवण्यात आला होती. या सेंद्रीय तांदूळ, गहू, मूग, हरभऱ्याला मोठी मागणी असल्याचे चित्र दिसत होते. पुणे जिल्ह्यातील एकूण 10 महिला स्वयंसहायताकडून दोन दिवसांमध्ये 1 लाख 67 हजार 700 रुपये एवढी उलाढाल झालेली आहे. तसेच 250 किलोग्रॅम तांदळाची मागणी नोंदवण्यात आलेली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील 5  महिला स्वयंसहायता समूहांची 2 लाख 35 हजार 500 रुपयांची डाळीची विक्री झाली आहे. 

या महोत्सवास भारत सरकारच्या ग्राम विकास मंत्रालयाचे संचालक राघवेंद्र सिंग, 'उमेद', नवी मुंबई चे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उस्मानाबाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त (विकास) विजय कुमार मुळीक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उस्मानाबादच्या प्रकल्प संचालक श्रीमती प्रांजल शिंदे, पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे तसेच विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी महोत्सवास भेट देऊन खरेदी केली. 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कापूस आयातीवरील सीमाशुल्क पूर्णपणे माफ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
कापूस आयातीवरील सीमाशुल्क पूर्णपणे माफ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
राज्यतील वातावरणात मोठा बदल, अमरावती जिल्ह्यात गारपीट, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका
राज्यतील वातावरणात मोठा बदल, अमरावती जिल्ह्यात गारपीट, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका
3 हजार रुपये दरासह विकलेल्या कांद्याला 1500 रुपयांचं अनुदान द्यावं, किसान सभेची सरकारकडे मागणी
3 हजार रुपये दरासह विकलेल्या कांद्याला 1500 रुपयांचं अनुदान द्यावं, किसान सभेची सरकारकडे मागणी
वातावरणात मोठा बदल! पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा 
वातावरणात मोठा बदल! पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा 

व्हिडीओ

Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
Satara Sangli Vidhan Parishad : सातारा सांगली विधानपरिषदेसाठी जयंत पाटील यांचा विश्वासू नेता उमेदवारी अर्ज भरणार, महायुतीचा उमेदवार कोण? 
सातारा सांगली विधानपरिषदेसाठी जयंत पाटील यांचा विश्वासू नेता उमेदवारी अर्ज भरणार, महायुतीचा उमेदवार कोण? 
IPL 2026: आयपीएलमध्ये चक्रीवादळ केलेला वैभव ते किंग कोहलीला क्लिन बोल्ड करणारा प्रिन्स; आयपीएल 2026 ने भारताला 10 भावी स्टार दिले
आयपीएलमध्ये चक्रीवादळ केलेला वैभव ते किंग कोहलीला क्लिन बोल्ड करणारा प्रिन्स; आयपीएल 2026 ने भारताला 10 भावी स्टार दिले
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं, दीड लाख कोटी बुडाले, रिलायन्सला सर्वाधिक फटका, फायद्यात कोण?
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं, दीड लाख कोटी बुडाले, रिलायन्सला सर्वाधिक फटका
N S Raja Subramani: देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
Embed widget