एक्स्प्लोर

PM Kisan Yojana : कधी मिळणार PM किसान सन्मान निधाचा 13 वा हप्ता? 'या' तारखेपर्यंत चांगली बातमी मिळण्याची शक्यता 

PM Kisan Yojana : PM किसान सन्मान निधी योजनेच्या 13 व्या हप्त्याची मदत लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे.

PM Kisan Yojana Update :  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आत्तापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात जमा झाले आहेत. लवकरच 13 व्या हप्त्याची मदत देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे. नवीन वर्षात ही आर्थिक मदत कधी मिळणार? याबाबत चर्चा सुरु आहे. दरम्यान,  शेतकऱ्यांनी त्याआधीच आपली eKYC तसेच रेशन कार्डहीत आपली सर्व कागदपत्रे अपडेट करावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

या महिन्यात शेतकऱ्यांना मिळणार 13 हप्ता

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांची मदत जमा होते. तीन हप्त्यांमध्ये हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना 12 हप्ते मिळाले असून लवकरच 13वा हप्ताही बँकेत वर्ग होणार आहे. यापूर्वी, 17 ऑक्टोबर 2022 रोजी 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 16 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली होती. आता 13 वा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता डिसेंबर 2022 ते मार्च 2023 दरम्यान हस्तांतरित केला जाणार आहे. दरवर्षी चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपये वर्ग केले जातात. आता पुढच्या 13 व्या हप्त्याचे पैसे 17 फेब्रुवारीपर्यंत हस्तांतरित केले जाऊ शकतात.

शेतकऱ्यांनी eKYC आणि रेशन कार्ड क्रमांक अपडेट करावेत  

नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी 15 ते 20 डिसेंबर दरम्यान शेतकऱ्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं अद्याप 13 व्या हप्त्याबाबत कोणतेही अधिकृत माहिती दिलेली नाही. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ज्यावेळी 11 वा हप्ता जमी झाला होता. त्यावेळी अनेक ठिकाणी फसवणुकीची प्रकरणं समोर आली होती. अनेक मृत शेतकरी, अपात्र शेतकरी, सरकारी कर्मचारी, श्रीमंत कुटुंबातील लोक यांच्या खात्यावर देखील पंतप्रधान किसान योजनेचे पैसे जमा झाले होते. त्यानंतर सरकारने ई-केवायसी, जमीन रेकॉर्ड पडताळणी आणि आता शिधापत्रिका क्रमांक सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. दरम्यान, 13 वा हप्ता जमा हण्यापूर्वीचं शेतकऱ्यांनी आपली eKYC तसेच रेशन कार्ड क्रमांक लवकरात लवकर अपडेट करावेत असे सांगण्यात आले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

PM Kisan Yojana : आता केवळ आधार कार्डद्वारे तपासली जाणार नाही PM किसान योजनेचे स्टेटस, सरकारने केला मोठा बदल

महत्त्वाच्या बातम्या

पाच हजारांची मदत अपुरी, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, शेतकऱ्यांच्या भावना पोहोचवणार, तटकरेंची माहिती, तर अर्थ खात्यासाठी राष्ट्रवादी आग्रही
पाच हजारांची मदत अपुरी, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, शेतकऱ्यांच्या भावना पोहोचवणार, तटकरेंची माहिती, तर अर्थ खात्यासाठी राष्ट्रवादी आग्रही
पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
Shetkari Microfinance vs Bank Loan : सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
Chandrashekhar Bawankule: 'मायक्रो फायनान्स'चा हैदोस या राज्यात चालणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सज्जड दम देत इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना थेट कारवाईच्या सूचना
'मायक्रो फायनान्स'चा हैदोस या राज्यात चालणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सज्जड दम देत इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना थेट गुन्हा दाखल करण्याच्या सूचना

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
Embed widget