PM Kisan Scheme : तुम्हालाही 11 व्या हप्त्याचे 2000 रुपये हवे आहेत? मग लवकर 'हे' काम करा, अन्यथा खात्यात पैसे येणार नाहीत!
PM Kisan Scheme 2022 : पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता ट्रान्सफर करत आहे.
PM Kisan Scheme Status : पंतप्रधान किसान योजना (PM Kisan Scheme 2022) अंतर्गत केंद्र सरकार (Central Government) शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता ट्रान्सफर करत आहे. तुम्हीही 11व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. 11व्या हप्त्याचे पैसे सरकार होळीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत. जर तुम्हालाही हे पैसे हवे असतील तर तुम्ही त्यापूर्वी 31 मार्चपर्यंत महत्त्वाचे काम करा, अन्यथा हे पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत.
ई-केवायसी लवकर करा :
अनेक अपात्र लोक या सरकारी योजनेचा लाभ घेत होते. त्यामुळे सरकारने प्रत्येकासाठी ई-केवायसी आवश्यक केले आहे. जर तुम्ही हे केवायसी केले नाही तर, 11व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत. ई-केवायसी शिवाय तुमचा 11 वा हप्ता पूर्ण होणार नाही. हे केवायसी तुम्ही घरी बसून ऑनलाइन करू शकता.
eKYC कसे करावे ?
- ई-केवायसी करण्यासाठी, तुम्हाला प्रथम अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जावे लागेल.
- तुम्हाला वरच्या उजव्या कोपर्यात ekyc चा पर्याय दिसेल.
- तुम्हाला या eKYC वर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
- यानंतर तुम्हाला इमेज कोड टाकावा लागेल आणि submit बटणावर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि OTP भरावा लागेल.
- यानंतर, तुमचे सर्व तपशील पूर्णपणे वैध असल्यास, तुमची eKYC प्रक्रिया पूर्ण होईल.
- जर तुमची प्रक्रिया बरोबर नसेल तर invalid असे लिहिले जाईल.
- तुम्ही आधार सेवा केंद्राला भेट देऊन हे दुरुस्त करू शकता.
11व्या हप्त्याचे पैसे कधी येणार ?
पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान पहिल्या हप्त्याची रक्कम दिली जाते. त्याच वेळी, दुसऱ्या हप्त्याचे पैसे 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान ट्रान्सफर केले जातात. याशिवाय तिसऱ्या हप्त्याचे पैसे 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान ट्रान्सफर केले जातात. त्यानुसार एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावर 11 हप्त्याची रक्कम जमा होणार आहे.
1 जानेवारी रोजी 10वा हप्ता ट्रान्सफर करण्यात आला
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याचे पैसे 1 जानेवारी 2022 रोजी शेतकर्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या :
- Petrol Diesel Price : महंगाई डायन खाए... पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा कडाडले; पेट्रोल 30 तर डिझेल 35 पैशांनी महाग
- Gold Silver Price Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा दर 50 हजारांच्या खाली, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा दर
- Share Market Updates: शेअर बाजारात घसरगुंडी; सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha