एक्स्प्लोर

गोपीनाथराव मुंडेंच्या मित्राला धनंजय मुंडेंकडून पुन्हा संधी

शेतकरी नेते पाशा पटेल यांची आज राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.

Pasha Patel : स्व.गोपीनाथ मुंडे यांचे अत्यंत जुने सहकारी मित्र म्हणून राज्यभरात ओळख असलेले शेतकरी नेते पाशा पटेल यांची आज राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. पाशा पटेल यांच्या माध्यमातून स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या सच्च्या मित्राला कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा संधी दिली आहे.

धनंजय मुंडे यांच्यात आणि पाशा पटेल यांच्यामध्ये कायमच गुरु -शिष्याचे नाते

पाशा पटेल हे याआधीही राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. शेतीविषयक अभ्यासू नेतृत्व व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे उत्कृष्ट जाणकार म्हणून त्यांची ओळख आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यात आणि पाशा पटेल यांच्यामध्ये कायमच गुरु -शिष्याचे नाते आजवर राहिलेले आहे. पाशा पटेल यांच्याशी असलेल्या या नात्याबाबत धनंजय मुंडे यांनी नुकतेच औसा (जि. लातूर) येथे एका भाषणात बोलून दाखवले होते. दरम्यान आज या नियुक्तीच्या माध्यमातून आपण पाशा पटेल यांना गुरुदक्षिणा दिली असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. 

पाशा पटेल शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतील

पाशा पटेल यांचे कृषी क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान आहे. बांबू लागवड, बांबूवरील संशोधन तसेच बांबू पासून विविध वस्तू निर्मिती याबाबतचा औसा येथील त्यांचा प्रकल्प मॉडेल आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून पाशा पटेल पुन्हा एकदा आपल्या कार्याचा ठसा उमटवत शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय घेतील, असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Dhananjay Munde : मला ज्या दिवशी जात सांगण्याची वेळ येईल त्याच क्षणी राजकारण सोडून देईल: धनंजय मुंडे

महत्त्वाच्या बातम्या

ऊस दराचा तिढा कायम! साखर कारखानदार 3150 वर ठाम, शेतकरी संघटनेची भूमिका काय? बैठकीत नेमकी काय झाली चर्चा?  
ऊस दराचा तिढा कायम! साखर कारखानदार 3150 वर ठाम, शेतकरी संघटनेची भूमिका काय? बैठकीत नेमकी काय झाली चर्चा?  
सत्ताधारी शेतकऱ्यांना उध्वस्त करतायेत, फायनान्सवाले आले तर पैसे नाहीत म्हणायचं, जरांगे पाटलांचा हल्लाबोल
सत्ताधारी शेतकऱ्यांना उध्वस्त करतायेत, फायनान्सवाले आले तर पैसे नाहीत म्हणायचं, जरांगे पाटलांचा हल्लाबोल
Solapur : ऊसदराची बैठक आज रात्रीच! कंडका पडणार का? तोडगा न निघाल्यास बेमुदत रेल रोको ते महामार्ग बंद, राजू शेट्टींचा इशारा
ऊसदराची बैठक आज रात्रीच! कंडका पडणार का? तोडगा न निघाल्यास बेमुदत रेल रोको ते महामार्ग बंद, राजू शेट्टींचा इशारा
Maharashtra Farmers Farmer ID : शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन

व्हिडीओ

Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Forest Department Scam : झाडं न लावताच साडेबारा कोटींचा चुराडा? पुण्यात वृक्षलागवड घोटाळ्याचा आरोप; रोपं सुकली, बिलं निघाली! नेमकं काय घडलं?
झाडं न लावताच साडेबारा कोटींचा चुराडा? पुण्यात वृक्षलागवड घोटाळ्याचा आरोप; रोपं सुकली, बिलं निघाली! नेमकं काय घडलं?
Mumbai Crime Local Train: रेड स्कर्ट, हाय हिल्स घातलेली तरुणी लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनला लटकली, शरीर मागे झोकून दिलं अन्... गोरेगाव स्टेशनवर सगळे पाहतच राहिले
रेड स्कर्ट, हाय हिल्स घातलेली तरुणी लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनला लटकली, शरीर मागे झोकून दिलं अन्... गोरेगाव स्टेशनवर सगळे पाहतच राहिले
Chhatrapati Sambhajinagar: रात्री 8 वाजून 57 मिनिटांच्या पोलीसांना फोन आला अन्..., तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा! स्वतःची दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच झोपला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
रात्री 8 वाजून 57 मिनिटांच्या पोलीसांना फोन आला अन्..., तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा! स्वतःची दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच झोपला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
IND vs NZ 1st Test Day-1 : बॅट नाहीये... म्हणत शुभमन गिल थेट पंचांशी भिडला; तिसऱ्या पंचांच्या 'त्या' वादग्रस्त निर्णयाने वेलिंग्टनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! नेमकं काय घडलं?
बॅट नाहीये... म्हणत शुभमन गिल थेट पंचांशी भिडला; तिसऱ्या पंचांच्या 'त्या' वादग्रस्त निर्णयाने वेलिंग्टनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! नेमकं काय घडलं?
Rudransh Thakur Viral Video: हटके स्टाईल अन् स्वॅग भारी! अवघ्या 23 महिन्याच्या 'रुद्रांश'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, अकरा कोटी चहात्यांना व्हिडिओची भुरळ, तर 90 लाख लोकांनी दिली पसंती
हटके स्टाईल अन् स्वॅग भारी! अवघ्या 23 महिन्याच्या 'रुद्रांश'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, अकरा कोटी चहात्यांना व्हिडिओची भुरळ, तर 90 लाख लोकांनी दिली पसंती
Maharashtra Live blog updates: कर्जाचे हप्ते थकल्याने घर सील, आता भाडे भरण्याचेही पैसे नाहीत, लातूरमध्ये शेतकरी कुटुंबाची बिकट अवस्था
Maharashtra Live blog updates: कर्जाचे हप्ते थकल्याने घर सील, आता भाडे भरण्याचेही पैसे नाहीत, लातूरमध्ये शेतकरी कुटुंबाची बिकट अवस्था
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
Embed widget