(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agricultural News : ICAR आणि ICRISAT यांच्यात भागीदारी, शेती पिकांच्या विकासासाठी मदत होणार
जल व्यवस्थापनासाठी आंतरराष्ट्रीय अर्ध-शुष्क कटिबंधातील पीक संशोधन संस्था आणि भारतीय कृषी संशोधन संस्था यांच्यात भागीदारी झाली आहे
Agricultural News : जल व्यवस्थापनासाठी आंतरराष्ट्रीय अर्ध-शुष्क कटिबंधातील पीक संशोधन संस्था (International Crops Research Institute for the Semi-Arid Tropics) आणि भारतीय कृषी संशोधन संस्था (Indian Council of Agricultural Research) यांच्यात भागीदारी झाली आहे. सहयोगी कार्य योजनेमध्ये (2019-2023) तीन संशोधन प्रकल्पांचा समावेश आहे. शेंगा असलेली धान्ये, कोरडवाहू तृणधान्यांची उत्पादक क्षमता, तसेच गुणवत्ता वैशिष्ट्ये वाढवण्यासाठी या पिकांचा जनुकीय विकास याचा समावेश आहे. यामुळं शेती पिकांच्या विकासासाठी मदत होणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी याबाबत राज्यसभेत माहिती दिली.
अवर्षणप्रवण वातावरणात बाजरीच्या विविध जाती विकसित करण्यासाठी एक सहयोगी प्रकल्प सप्टेंबर 2021 मध्ये पूर्ण झाला आहे. विज्ञान-आधारित पर्जन्य जलसंचयाच्या माध्यमातून आणि व्यवस्थापन तंत्रज्ञान वापरुन कोरडवाहू क्षेत्राची उत्पादकता सुधारण्याच्या अनुषंगाने संभाव्य सहकार्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्ध-शुष्क कटिबंधातील पीक संशोधन संस्था भारतीय कृषी संशोधन संस्थासंस्थांसोबत कार्यरत आहे. शेंगा असलेली धान्ये म्हणजेच हरभरा, तुरी आणि भुईमूग तसेच कोरडवाहू तृणधान्ये म्हणजेच ज्वारी, बाजरी आणि नाचणी यांची उत्पादक क्षमता, जुळवून घेण्याची क्षमता आणि परिणाम तसेच गुणवत्ता वैशिष्ट्ये वाढवण्यासाठी या पिकांचा जनुकीय विकास करण्यासाठी काम करण्यात येार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
भारतीय कृषी संशोधन संस्था
भारतीय कृषी संशोधन संस्था ही भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग अंतर्गत स्वायत्त संस्था आहे. पूर्वी इम्पीरियल कौन्सिल ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्च म्हणून ओळखले जाणारे, रॉयल कमिशन ऑन ऍग्रीकल्चरच्या अहवालानुसार सोसायटी नोंदणी कायदा, 1860 अंतर्गत नोंदणीकृत सोसायटी म्हणून 16 जुलै 1929 रोजी त्याची स्थापना करण्यात आली. ICAR चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. परिषद संपूर्ण देशात फलोत्पादन, मत्स्यपालन आणि प्राणी विज्ञान यासह कृषी क्षेत्रातील संशोधन आणि शिक्षणाचे समन्वय, मार्गदर्शन आणि व्यवस्थापन करणारी सर्वोच्च संस्था आहे. देशभरात पसरलेल्या 111 ICAR संस्था आणि 71 कृषी विद्यापीठांसह ही जगातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय कृषी प्रणालींपैकी एक आहे. ICAR ने आपल्या संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाद्वारे भारतातील हरितक्रांती आणि त्यानंतरच्या कृषी क्षेत्रात घडामोडी घडवून आणण्यात अग्रणी भूमिका बजावली आहे. कृषी क्षेत्रातील उच्च शिक्षणातील उत्कृष्टतेला चालना देण्यात याने मोठी भूमिका बजावली आहे.
इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी-अरिड ट्रॉपिक्स (ICRISAT) ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. जी विकासासाठी वैज्ञानिक संशोधन करते.