Pakistan's Red Chilli : अशियातील मिरची राजधानीला पुराचा मोठा फटका, पाकिस्तानात दर वाढण्याची शक्यता
Pakistan's Red Chilli : पुराच्या थैमानानं पाकिस्तानच्या शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. पाकिस्तानातील प्रसिद्ध असलेल्या लाल मिरचीचे पीक पुरामुळं नष्ट झालं आहे.
Pakistan's Red Chilli : आपला शेजारी असलेल्या पाकिस्तानला देशाला यावर्षी पुराचा मोठा फटका बसला आहे. पुराच्या थैमानानं पाकिस्तानच्या शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. पाकिस्तानातील प्रसिद्ध असलेलया लाल मिरचीचे पीक पुरामुळं नष्ट झालं आहे. त्यामुळं यंदा लाल मिरची अधिक महागण्याची शक्यता आहे. दक्षिण पाकिस्तानातील कुनरी हे शहर आशिया खंडातील मिरचीची राजधानी म्हणून ओळखली जाते. तिथेही मिरची पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. भारताबरोबरही पाकिस्तानचा मिरचीचा व्यापार आहे.
पुरामुळे 40 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान
देशात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. काही भागात अतिवृष्टी देखील झाली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. भारताबरोबरच आपला शेजारचा देश असलेल्या पाकिस्तानला देखील अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. शेती पिकांचं मोटं नुकसान झालं आहे. दरम्यान, पाकिस्तानातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात इतर देशांना लाल मिरची पाठवली जाते. मात्र, यावर्षी पुराचा मोठा तडाखा मिरचीला बसला आहे. दक्षिण पाकिस्तानातील कुनरी शहर आशिया खंडातील मिरचीची राजधानी म्हणून ओळखले जाते. मात्र, तिथेही मरची पिकाला मोठा फटका बसला आहे. तापमानात होत असलेली वाढ आणि पुराचा पाकिस्तानमधील मिरचीच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. यंदा उष्णतेसह पावसाचे प्रमाण अधिक झाल्यानं पुराची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे मिरचीचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. पाकिस्तानच्या कृषी विभागाच्या अधिकार्यांनी आधीच पुरामुळे 40 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
मिरची पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा कणा
पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर मिरचीचे उत्पादन घेतलं जातं. हा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पाकिस्तानमधील 1 लाख 50 हजार एकर (60 हजार 700 हेक्टर) शेतात दरवर्षी 1 लाख 43 हजार 000 टन मिरचीचे उत्पादन होते. एवढ्या मोठ्या उत्पादनामुळं मिरचीच्या उत्पादनात पाकिस्तानचा जगात चौथा क्रमांक लागतो.
मिरचीसाठी कापसाचा त्याग
पाकिस्तानच्या कृषी संशोधन परिषदेच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत उष्णतेमुळं मिरची पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. उष्णतेमुळं पिकांवर रोगांचे प्रमाण वाढत आहे. पिकांच्या उत्पन्नात झपाट्यानं घट झाली आहे. काही महिन्यांपूर्वी पुरामुळं शेतात पाणी शिरलं होतं. यामुळं मिरची पिकाचेही नुकसान झाले आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार मिरची पिकाला संजीवनी देण्यासाठी कापूस पिकाचा बळी देण्यात आला आहे. तिथे सध्या केवळ 30 टक्के मिरची टिकली आहे. गेल्या वर्षी मिरची बाजारात 8 ते 10 हजार पोती आली होती. यंदा फक्त 2000 पोती शिल्लक आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: