Sadabhau Khot : रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत यांच्या 'जागर शेतकऱ्यांचा आकोश महाराष्ट्राचा' या राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात आजपासून होत आहे. आज सकाळी दहा वाजता त्यांच्या दौऱ्याला सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन सुरुवात होणार आहे. सदाभाऊ खोत यांच्याबरोबर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित असणार आहेत. सध्या राज्यातील शेतकरी, शेतमजुरांचे,तरुणांचे व्यवसायिकांचे अनेक प्रश्न आहेत. या प्रशांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे अभियान राबवण्यात आले आहे.


सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन सुरुवात


सकाळी 10 वाजता सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर 11 वाजता मालवण येथी पारंपारीक मच्छीमारांसोबत चर्चा सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे चर्चा करणार आहेत. तसेच पर्यटन महासंघ, सिंधुदूर्ग किल्ल्याच्या संदर्भात चर्चा करणार आहेत. 1 वाजता ते निलकांती गेस्ट हाऊस, मालवण याठिकाणी पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर तीन वाजता भाजपच्या किसान मोर्चाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. तर 5 वाजता कळणे येथील याणी प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या उपोषणाला भेट देणार आहेत. सायंकाळी सात वाजता खारेपाटण (ता. कणकवली) याठिकाणी यात्रेचे स्वागत होणार आहे. तर चिंचोली याठिकाणी शेतकऱ्यांशी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे संवाद साधणार आहेत.


गेल्या अडीच वर्षापासून महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, बेरोजगार तरुण यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. परंतू राज्य सरकार कोणत्याही प्रश्नाकडे लक्ष न देता केवळ आरोप-प्रत्यारोप करत आहे. आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न गंभीर बनले आहेत. लोडशेडींग, अतिरिक्त ऊस, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, विज बिलमाफी, शैक्षणिक समस्या, रखडलेल्या भरती, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, पेट्रोल डिझेल, दरवाढ,  अतिवृष्टी, वादळ, महापुर, दुष्काळ, रासायनिक खत टंचाई, बोगस बियाणे, शेतमाल हमीभाव या समस्या आहेत. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे. दरम्यान, आमची लढाई ही आता इंडियावाल्यांशी असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सध्या शेतकऱ्यांसमोर काय समस्या आहेत हे जाणून घेणार आहोत. युवकांचे प्रश्न, शेतकऱ्याचे प्रश्न, व्यावसायिकांचे प्रश्न काय आहेत यासंबंधीची माहिती घेणार आहोत.


महत्त्वाच्या बातम्या: