एक्स्प्लोर

Onion Price : पंतप्रधान मोदींना पोस्टाद्वारे कांदे भेट म्हणून पाठवले, नगरमधील शेतकऱ्यांची गांधीगिरी

Onion Price : अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी संघटना आणि शेतकरी विकास मंडळाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पोस्टामार्फत कांदे भेट म्हणून पाठवले आहेत. गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकऱ्यांनी गांधीगिरी केली.

Onion Price Issue : कांद्याचे भाव (Onion Price) घसरल्याने शेतकरी (Farmers) संकटात सापडलेला असल्याने ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे, आंदोलन करत आहेत. सरकारने कांद्याचा हमीभाव, निर्यात धोरण बदलावे ही मागणी घेऊन अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी संघटना आणि शेतकरी विकास मंडळाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पोस्टामार्फत कांदे भेट म्हणून पाठवले आहेत. गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकऱ्यांनी गांधीगिरी केली आहे. सोबतच जर शासनाला कांद्याला भाव देता येत नसेल ते शेतकऱ्यांना रोटाव्हेटर घेण्यासाठी अनुदान द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याला एक रुपयापासून सहा रुपयांपर्यंत कांदा विकावा लागत आहे.

उद्विग्न शेतकऱ्याकडून कांद्याची होळी

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील मातुलठाण गावातील कांदा उत्पादक शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी कांद्याला भाव मिळत नसल्याने उद्विग्न होऊन आपल्या शेतात कांद्याची होळी केली.  तळहातावरील फोडाप्रमाणे कांदा पीक जपलं, वाढवलं आज त्याच हातांनी शेतकऱ्याने काल दीड एकरवरील कांदा पिकाची होळी करुन सरकारच्या निषेधार्थ अग्निडाग आंदोलन केले. कांद्याची होळी करण्यासाठी आणि यातून सरकारविरोधातील रोष व्यक्त करण्यासाठी निम्याहून अधिक गाव लोटला होता., प्रत्येकाच्या भावना एकसारख्या होत्या, त्यामुळे लहान मुले, बाया बापडे सारेच मनावर दगड ठेवून कांद्याला अग्नी देत होते. जणू घरातली एखाद्या व्यक्तीचे निधन झाले आशा भावनेने एकीकडे डोळ्यांतून अश्रूंना वेगळी वाट करुन देत होते.

नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी होत आहे हा विश्वास निर्माण करण्यात सरकारला अपयश आलं आहे. त्यामुळे नाफेडसह केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला जात आहे. त्याचबरोबर कांद्याला हमीभाव द्या आणि नुकसान भरुन काढण्यासाठी अनुदान द्या ही मागणी केली जात आहे. 

शेतकऱ्यांची थट्टा

अहमदनगरच्या बाजारपेठेत एका शेतकऱ्याच्या कांद्याला दोन रुपये किलोचा भाव मिळाला. 17 गोण्या कांदा विकल्यानंतर त्याच्या हाती केवळ एक रुपया पडला. बीडच्या आष्टी तालुक्यातील बावी येथील शेतकऱ्याच्या बाबतीत घडले आहे. नामदेव लटपटे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. असाच प्रकार सोलापुरात घडला होता. सोलापूर बाजार समितीमध्ये (Solapur Market Committee) 10 पोती कांद्यांची विक्री केल्यावर शेतकऱ्याला फक्त दोन रुपये मिळाले. ते पैसेही चेक स्वरुपात देण्यात आले. राजेंद्र तुकाराम चव्हाण असं या शेतकऱ्याचे नाव आहे. 

हेही वाचा

Onion Price : 10 पोते कांदा विकल्यावर शेतकऱ्याला मिळाले फक्त दोन रुपये... ते ही चेकद्वारे..!

महत्त्वाच्या बातम्या

कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget