एक्स्प्लोर

Farmers suicides : पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या स्मृतीपित्यर्थ किसानपुत्रांचा 19 मार्चला मेळावा, आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी

19 मार्च 1986 ला साहेबराव करपे यांच्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली होती. या घटनेच्या स्मृतीपित्यर्थ किसानपुत्रांचा 19 मार्चला मेळावा होणार आहे.

Farmers suicides : शेतकऱ्यांच्या दररोज आत्महत्या होत आहेत. आतापर्यंत देशात जवळपास पाच लाख शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या होतात. असे असताना, राज्य असो वा केंद्र सरकार त्याकडे गंभीरपणे लक्ष देत नाही. शेतकरी आत्महत्यांना 'राष्ट्रीय आपत्ती' मानले पाहिजे. तसेच एकाही शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी येणार नाही, यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी मागणी किसानपुत्र आंदोलनानं केली आहे. दरम्यान, 19 मार्च 1986 ला साहेबराव करपे यांच्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली होती. ही राज्यातील शेतकरी आत्महत्येची पहिली घटना आहे. या घटनेच्या स्मृतीपित्यर्थ किसानपुत्र आंदोलनाच्या वतीनं 19 मार्चला उपवास तसेच पदयात्रा काढण्यात येणार आहे. तसेच आंबाजोगाईत किसानपुत्रांचा मेळावा देखील होणार असल्याची माहिती किसानपुत्र आंदोलनचे अमर हबीब यांनी दिली.

19 मार्च 1986 ला साहेबराव करपे यांच्या संपूर्ण कुटुंबानं आत्महत्या केली होती. वीज बिल भरले नाही म्हणून त्यांची वीज कट करण्यात आली होती. ते वीज बिल भरु शकले नाहीत. जमीन विकायला काढली तर ग्राहक नाही. अशा परिस्थितीत साहेबराव यांना आत्महत्या करावी लागली. या घटनेच्या स्मृतीपित्यर्थ 2017 पासून किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने दरवर्षी 19 मार्चला 'अन्नत्याग आंदोलन' केलं जातं. या आंदोलनात महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील व विदेशात गेलेले किसानपुत्र देखील सहभागी होतात. लाखाहून अधिक लोक 19 मार्चला उपवास करतात. 2017 ला साहेबराव करपे यांचे गाव चील गव्हाणला भेट देऊन महागाव येथे उपोषण केल्याची माहिती अमर हबीब यांनी दिली. 2018 साली साहेबराव यांच्या कुटुंबियांनी जिथे आत्महत्या केली होती, त्या दत्तपूर (जि. वर्धा) जवळ पवनार आश्रम येथे उपोषण केले. पुढच्या वर्षी दिल्लीत महात्मा गांधी समाधी परिसरात देशातील अन्य राज्यातील मित्रांसोबत उपवास केला. 2020 ला पुण्यात महात्मा फुले वाड्याला भेट देऊन बालगंधर्वच्या समोर उपोषण केलं होतं. गेल्या वर्षी औंढा नागनाथ येथून चीलगव्हाण पर्यंत किसानपुत्रांनी पदयात्रा काढली होती. चिल गव्हाण येथे उपवासाची सांगता करण्यात आली होती, अशी माहिती अमर हबीब यांनी दिली होती.

Farmers suicides : पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या स्मृतीपित्यर्थ किसानपुत्रांचा 19 मार्चला मेळावा, आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी

दरम्यान, यावर्षी आम्ही पानगाव येथून पदयात्रा काढीत आहोत. पदयात्रेत महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यातून आलेले 50  किसानपुत्र भाग घेणार आहेत. 1980 साली पोलीस गोळीबारात ठार झालेल्या हुतात्मा रमेश मुगे यांच्या स्मारकाला अभिवादन करुन ही पदयात्रा निघेल. ती फावडेवाडी, चोपनवाडी मार्गे जाऊन घाटनांदूर येथे मुक्काम करेल. 18 तारखेला ही पदयात्रा दत्तपूरमार्गे पूसला जाऊन गिरवली येथे मुक्काम करेल. गिरवली येथे महिलांचा मेळावा होईल. डॉ. शैलजा बरुरे या मेळाव्याला मार्गदर्शन करतील. 19 मार्च रोजी धायगुडा पिंपळामार्गे पदयात्री अंबाजोगाईला जातील. दुपारी अडीच वाजता अंबाजोगाईच्या आंबेडकर चौकात या पदयात्रेचे स्वागत होईल. 3 वाजता श्री मुकुंदराज साभागृहात किसानपुत्रांचा मेळावा होईल. या मेळाव्याला अमर हबीब, डॉ राजीव बसरगेकर, सुभाष कच्छवे व महाराष्ट्रातील भिन्न जिल्ह्यातून आलेले किसानपुत्र मार्गदर्शन करणार आहेत.

जोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत राहतील तोपर्यंत दरवर्षी 19 मार्च रोजी किसानपुत्र उपवास करीत राहतील. शेतकरी आत्महत्यांचे संकट लवकर दूर व्हावे यासाठी किसानपुत्रांची ही धडपड आहे. 19 मार्च रोजी जास्तीजास्त लोकांनी उपवास करावा असे आवाहन अमर हबीब, यांनी केले आहे.

शेतकरीविरोधी कायदे 

शेतकऱ्यांच्या आत्महत्या या आत्महत्या नसून सरकारने पाडलेले खून आहेत. कारण शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण काही कायदे आहेत. ते मागच्या सरकारांनी केले आहे. वर्तमान सरकार देखील ते कायदे रद्द करीत नाही. कमाल शेतजमीन धारणा (सीलिंग), आवश्यक वस्तू, जमीन अधिग्रहण आदी नरभक्षी कायदे शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण आहेत. ते तत्काळ रद्द झाले पाहिजेत. हे कायदे पक्षपात करणारे आहेत. मुलभूत अधिकारात हस्तक्षेप करणारे आहेत. घटना विरोधी असल्याचे अमर हबीब म्हणाले.

हे कायदे टिकून राहावे म्हणून आपल्या मूळ घटनेत नसलेले पण पहिली घटना दुरुस्ती करुन टाकलेले 9 वे परिशिष्ट हे होय. या परिशिष्टात टाकलेल्या कायद्यांच्या विरोधात न्यायालयात जाता येत नाही. म्हणून हे कायदे टिकून राहिले आहेत. परिशिष्ट 9 मध्ये आज 284 कायदे आहेत. त्यापैकी 250 कायदे थेट शेतकऱ्यांशी संबंधित आहेत. सीलिंग, आवश्यक वस्तू, अधिग्रहण हे कायदे या परिशिष्टात असल्यामुळं ते टिकून राहिले आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न गरिबीचा नसून गुलामीचा आहे. म्हणून शेतकऱ्यांना या कायद्यातून सोडवणं महत्वाचे आहे असे किसानपुत्र आंदोलनाचे म्हणणे आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget