एक्स्प्लोर

Maha Budget 2021 Agriculture | तीन लाखांपर्यंतच्या कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज शून्य टक्क्याने, अर्थसंकल्पात घोषणा

Maharashtra Budget Agriculture Sector | कोरोना काळातही राज्यातील कृषी क्षेत्राने चांगली प्रगती केली असून राज्य सरकारने जाहीर केलेल्या कृषीमाफीचा फायदा हा शेतकऱ्यांना झाला असल्याचं अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितलं.

मुंबई : कोरोना काळात महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची दखल घेत आणि महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली. त्यावेळी कोरोना काळातही राज्यातील कृषी क्षेत्राने चांगली प्रगती केली असून राज्य सरकारने जाहीर केलेल्या कृषीमाफीचा फायदा हा शेतकऱ्यांना झाला असल्याचं अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितलं.

कोरोना काळात सर्व क्षेत्रात मंदी असताना राज्यातील कृषी क्षेत्राने चांगली प्रगती केली. या काळात राज्यातील कृषी आणि सलग्न क्षेत्रात 11.7 टक्के इतकी भरघोस वाढ पहायला मिळाली. त्यामुळे शेती आणि शेतकरी यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितलं.

तीन लाखांपर्यंत मर्यादीत कर्ज घेणाऱ्या आणि त्याची परतफेड वेळेत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना झाला असून 31 लाख 23 हजार शेतककऱ्यांना कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.

एपीएमसीच्या बळकटीसाठी 2 हजार कोटी रुपये देण्याचे जाहीर केले असून पशुसंवर्धन आणि मत्स्य योजनेसाठी 3700 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. अमरावतीच्या मोर्शीमध्ये संत्रा प्रकल्पाची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

अहिल्याबाई होळकरांच्या नावावर तालुकास्तरावर रोपवाटीका केंद्रांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. राज्यात एकूण 26 सिंचन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत, तर 12 धरणाच्या बळकटीसाठी 624 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गोसीखुर्द प्रकल्पासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पनाच्या विक्रीसाठी सुरु करण्यात आलेल्या 'विकेल ते पिकेल' या योजनेसाठी 2 हजार 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

शेतमालाचा व्यवहार अधिक पारदर्शक व्हावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचं सांगत अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, कृषी पंपाच्या सौर उर्जा जोडणीसाठी महावितरणाला 1500 कोटी देण्यात येणार आहेत. पक्का गोठा बांधण्यासाठीही राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी घोषित केलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Agriculture News: स्वयंपाकघरापासून औषधांपर्यंत... वर्षभर कायम मागणी; बडीशेप लागवड ठरू शकते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय
स्वयंपाकघरापासून औषधांपर्यंत... वर्षभर कायम मागणी; बडीशेप लागवड ठरू शकते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय
बोगस सोयबीन प्रकरण! अकोल्यात आणखी 9 बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल, निकृष्ट दर्जाचे बियाणे असल्याचं समोर
बोगस सोयबीन प्रकरण! अकोल्यात आणखी 9 बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल, निकृष्ट दर्जाचे बियाणे असल्याचं समोर
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
Bogus Seeds News : राज्यभरात बोगस खत ,अन् निकृष्ठ बियाणांचा सुळसुळाट; आता फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन, नेमकं काय होणार?
राज्यभरात बोगस खत ,अन् निकृष्ठ बियाणांचा सुळसुळाट; आता फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन, नेमकं काय होणार?

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Embed widget