एक्स्प्लोर

पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रती एकर 10 हजार रुपये द्या, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांची सरकारकडे शिफारस

Agriculture  News : विशेष म्हणजे अशाप्रकारे सरकारकडे शिफारस करणारे केंद्रकर पहिले अधिकारी आहे. 

Agriculture  News : कधी अवकाळी तर कधी अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील (Marathwada) शेतकरी संकटात सापडला आहे. त्यात डोक्यावर झालेलं कर्ज आणि आर्थिक परिस्थितीला कंटाळून अनेक शेतकरी आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल उचलत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) यांनी आठही जिल्ह्यात एक सर्व्हे केला आहे. ज्यात पाच लाख कुटुंबाचे 12 टप्प्यात आणि 100 प्रश्न तयार करुन हा सर्व्हे करण्यात आला आहे. तर शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी प्रती एकर 10 हजार रुपये रोख रक्कम देण्याचा निकष या सर्व्हेमधून काढण्यात आला आहे. तर याबाबतचं अहवाल सरकारला देणार असल्याची माहिती सुनील केंद्रेकर यांनी दिली आहे. 

सर्व्हे करताना प्रश्नांचे एकूण बारा विभाग करण्यात आले. यात एकूण 104 प्रश्नांची माहिती अधिकाऱ्यांमार्फत भरुन घेण्यात आली. यात आत्महत्या करण्याच्या विचारत असलेल्या शेतकऱ्यांची वेगळी यादी तयार करण्यात आली. तर अशा शेतकऱ्यांचा शासकीय खर्च करुन समुपदेशन करण्यात आले.

याबाबत बोलताना केंद्रेकर म्हणाले की, सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती खूप वाईट आहे. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही एक सर्व्हे केला. ज्यात आमच्या जिल्हाधिकारी यांनी देखील स्वतः शेतकऱ्यांच्या घरी जाऊन माहिती जमा केली. संपूर्ण सर्व्हेचा डेटा ऑनलाईन केला. ज्यात जे शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारत असल्यास त्याचा रेड अलर्ट दिसतो. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना कार्यालयात बोलावून त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांची अडचणी समजून घेतल्या जात आहे. तसेच त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. पण शेतकरी आत्महत्या करण्याचं महत्वाचा कारण आर्थिक परिस्थितीच आहे. त्यामुळे पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना 10 हजार रुपये प्रती एकर दिल्यास आत्महत्या रोखण्यात यश येऊ शकते असे केंद्रेकर म्हणाले. विशेष म्हणजे अशाप्रकारे सरकारकडे शिफारस करणारे केंद्रेकर पहिले अधिकारी आहे. 

सर्व्हेमधील प्रश्न कोणते? 

शेतकऱ्यांची प्राथमिक माहिती 

  • शेतकऱ्याचे नाव, पत्ता, शिक्षण, रोजगाराची माहिती, सात बारावर बोजा आहे का?

शेतकऱ्यांची कौटुंबिक माहिती:

  • कौटुंबिक माहिती, कुटुंबात विवाहयोग्य मुली आहेत का?
  • विवाह आर्थिक अडचण आहे का? 
  • कर्जामुळे कौटुंबिक कलह आहे का? 
  • व्यसन आहे का? 
  • घरात बेरोजगारांची संख्या

घरगुती सुविधा माहिती:  

  • स्वतःचं घर आहे का?
  • शासकीय योजनेमधून घर मिळाले आहे का? 
  • घरासाठी कर्ज काढले आहे का? 
  • वीज, गॅस, नळ शौचालय आहे का?

सामाजिक सहभाग विषयी माहिती: 

  • कुटुंबातील कोणी ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी, इतर स्वराज्य संस्था सदस्य आहेत का?
  • कुटुंबातील कोणी बचतगट सदस्य आहे का? 
  • धार्मिक कार्यक्रम आवड आहे का?

योजना लाभ विषयक माहिती: 

  • पिवळे रेशन कार्ड धारक कुटुंब आहे का?,  
  • नरेगा जॉब कार्ड आहे का?, 
  • जनधन योजना बँक खाते आहे का?,

आरोग्य पोषण आणि शिक्षण विषयक माहिती:

  • सद्यस्थितीतील कर्जाविषयक माहिती: 
  • राष्ट्रीय बँक कर्ज आहे का? असल्यास तपशील
  • सहकारी बँक कर्ज आहे का? 
  • वित्तीय संस्थेचं कर्ज आहे का? 
  • खाजगी सावरकर कर्ज आहे का? असल्यास तपशील 
  • कर्ज माफी मिळाली आहे का?

कौटुंबिक उपजीविकेविषयक माहिती:

  • एकूण शेतजमीन माहिती 
  • कोरडवाहू/जिरायत शेतीची माहिती
  • बागायत शेतजमीन माहिती 
  • शेतजमीन पाणी स्त्रोत 
  • शेतात वीज जोडणी आहे काय?
  • वीज बिल थकीत आहे का? असल्यास तपशील

मागील एक वर्षातील पीक व उत्पादन: 

  • खरीप, रब्बी,उन्हाळी,फळबाग, चारा पिके, बांधावरील झाडे यांची माहिती

कृषी योजनाविषयक माहिती: 

  • पाण्याचा स्त्रोत, पाईपलाईन, ठिबक, इत्यादी उपलब्ध आहे का? 
  • कोरडवाहू असल्यास मनेरगा अंतर्गत विहिरीची आवश्यकता आहे का?
  • शेततळ्याची आवश्यकता आहे काय?
  • कृषी खात्याच्या योजनेचा लाभ घेतलेला आहे काय? असल्यास तपशील 
  • पीक विमा योजना लाभ घेतला आहे काय? असल्यास तपशील 
  • शेती संबधी कोणत्या मदतीची गरज आहे? असल्यास तपशील

पशुधन विषयक बाबी:

  • पशुधन आहे का? असल्यास त्यांचे तपशील, 
  • पशुधन विमा घेतला असल्यास माहिती

स्थलांतर विषयक माहिती: 

  • कुटुंबातील कोणत्या सदस्याने स्थलांतर केले आहे का?, असल्यास तपशील 

व्यक्तीमधील ताण-नैराश्य ओळखण्यासाठी प्रश्नावली: 

  • नेहमी जास्त काळ उदास वाटते का? असल्यास तपशील
  • जास्तीत जास्त गोष्टीमध्ये आनंद किंवा रस वाटत नाही का?
  • बराच वेळ थकवा जाणवतो का?
  • झोप लागत नाही का?
  • भूक कमी किंवा जास्त लागते, 
  • खूप अस्वस्थ वाटते का?
  • अति झोप लागते का?
  • स्वतः बद्दल तीव्र नाराजी इत्यादी

इतर महत्वाच्या बातम्या: 

Marathwada : मराठवाडा विभागीय आयुक्तांकडून मान्सून उपाययोजना, पूर परिस्थितीचा आढावा; अशा केल्या सूचना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Mcoca : वाल्मीक कराडवर मकोका! पुढे काय कारवाई होणार? CID ला कोणते पुरावे मिळाले?Suresh Dhas On Walmik Karad Mcoca : कायदा कोणालाही सोडणार नाही, सुरेश धस यांची प्रतिक्रियाWalmik Karad Mcoca : वाल्मिक कराडवर मकोका, कराडच्या वकिलांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3PM 14 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
Suresh Dhas on Walmik Karad MCOCA : अखेर वाल्मिक कराडवर मकोका, टीकेचे राण पटेवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
अखेर वाल्मिक कराडवर मकोका, टीकेचे राण पटेवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!
कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!
Embed widget