एक्स्प्लोर

Maharashtra Amravti News : मेंढपाळांना पशूधन विमा योजना सुरू करा; मेंढपाळांची मागणी

Maharashtra Amravti News : मेंढपाळ धनगर विकास मंचाचे अध्यक्ष संतोष महात्मे यांनी मेंढपाळांना पशुधनविमा योजना सुरू करण्याबाबत केलेल्या मागणीचा लवकरच निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलं आहे.

Maharashtra Amravti News : मेंढपाळ धनगर विकास मंचाचे अध्यक्ष संतोष महात्मे यांनी मेंढपाळांना पशुधनविमा योजना सुरू करण्याबाबत केलेल्या मागणीवर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलं आहे. मेंढपाळांचा मेंढी चराईचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार आहे. तसेच मेंढपाळांना पशुधनविमा योजना सुरू करणं, तसेच या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक योजना या समाजासाठी राबविण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाहीही वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली होती.

मंत्रालयातील दालनात नुकतीच मेंढपाळांच्या प्रलंबित मागण्यांबाबत एक बैठक झाली. या बैठकीत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक कल्याणकुमार, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकासचे सहसचिव माणिक गुट्टे, अवर सचिव विकास कदम, उपायुक्त डॉ.शैलेशे पेठे, मेंढपाळ धनगर विकास मंच महाराष्ट्राचे संस्थापक संतोष महात्मे यांच्यासह अनेकजण या बैठकीला उपस्थित होते. 

यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, "मेंढपाळ आणि वन विभागाच्या संघर्षाची तक्रारी वारंवार येत आहे. हे लक्षात घेता वन विभागाकडून मेंढपाळांवर वन क्षेत्रात मेंढपाळानी चराई करण्याकरिता शासनाच्या आदेशान्वये बंदी आहे. तरी शासनाकडून बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त मेंढी पालन व्यवसायाला प्रोत्साहन देणं, कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढीपालन करणाऱ्या मेंढपाळाना शेडचं बांधकाम आणि मोकळ्या जागी पिण्याचं पाणी, चारा बियाणं, बहुवार्षिक गवत प्रजातीचं बियाणं उपलब्ध करून देण्याबाबत योजना प्रस्तावित कराव्यात, अशा सूचना यावेळी राज्यमंत्री यांनी बैठकीत दिल्या आहेत. मेंढपाळ धनगर विकास मंच महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष संतोष महात्मे यांनी मेंढपाळांचे विविध प्रश्न यावेळी बैठकीत मांडले. 

मेंढपाळांना देण्यात येणाऱ्या पशुधन विम्याचं कार्यक्षेत्र वाढवणार

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, "मेंढपाळांना देण्यात येणाऱ्या पशुधनविमा योजनांचे कार्यक्षेत्र वाढविण्याबाबत वरिष्ठ स्तरावर याबाबत बैठक घेवून लवकरच निर्णय घेण्यात येईल. शासनाकडून मेंढपाळांसाठी राबविण्यात येणा-या योजनांची माहिती व्हावी यासाठी लवकरच विभागस्तरीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात येईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी-मेंढी  विकास महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी 100 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. सध्या राज्यात 73 तालुक्यांत फिरतं पशू चिकीत्सालयं आहेत. लवकरच 80 तालुक्यात ही सुविधा वाढविण्याचा शासनाचा विचार आहे. फिरत्या पशू चिकीत्सालया करिता 1962 हा टोल फ्री क्रमांक आहे. त्याचा लाभ मेंढीपाळांनी घ्यावा. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मेंढपाळांना मिळावा, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शासन मेंढपाळांकडून आलेल्या सूचनांवर नक्कीच कार्यवाही करेल, अशी ग्वाही यावेही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीत दिली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Jaykumar Gorhe : जयकुमार गोरेवर गंभीर आरोप, आता खंडणीसाठी अटक नेमकं प्रकरण काय?Imtiaz Jaleel Majha Vision| नागपूर दंगल ते औरंगजेब, माझा व्हिजनमध्ये जलीलांचा भाजप, आझमींवर निशाणाEknath Shinde Majha Vision| खुर्चीसाठी भानगड नाहीच, तिघांची गाडी एकच,सत्ताधारी विरोधक रथाची दोन चाकंAaditya Thackeray Majha Vision | दिल्लीतील बहिण अजूनही लाडक्या, महाराष्ट्र अजून हफ्ता वाढ नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Embed widget