एक्स्प्लोर

Nanded farmers : पिकं वाया गेल्यानंतर नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस, तीन दिवसांपासून पावासाची रिपरिप

तब्बल 25 दिवसांची उघडीप दिल्यानंतर नांदेड जिल्ह्यात पाऊस होत आहे. 25 दिवस पाऊस नसल्यानं पिकं करपली होती. पिकं करपल्यानंतर पाऊस होत आहे.

Nanded farmers : सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस (Rain) कोसळत आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी शेती पिकांचेही या पावसामुळं नुकसान झालं आहे. दरम्यान, नांदेड (Nanded) जिल्ह्यातही गेल्या तीन दिवसापासून पावसाची रिपरिप सुरु आहे. तब्बल 25 दिवसांची उघडीप दिल्यानंतर पाऊस होत आहे. 25 दिवस पाऊस नसल्यानं पिकं करपली होती. पिके करपल्यानंतर जोरदार पाऊस होत आहे.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसामुळं पिकं अक्षरशः करपून गेली आहेत. गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. पावसाचा जोर जरी वाढला असला तरी असला तरी याचा कोणताही उपयोग पिकांसाठी होणार नाही. सतत होत असणाऱ्या जोरदार पावसामुळं विष्णुपुरी धरण प्रकल्पाच्या वरील बाजूस येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले आहेत. यातून 57 हजार 350 क्यूसेकने पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

3 लाख 50 हजार हेक्टर वरील सोयाबीन पिकाचे नुकसान

नांदडे जिल्ह्यात 4 लाख 50 हजार हेक्टर एवढा सोयाबीन पिकाचा पेरा झाला आहे. त्यातील 3 लाख 50 हजार हेक्टर वरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. उन्हामुळं ही पिकं वाळून गेली होती. पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेल्या बेफाम अतिवृष्टीनं 80 टक्के पिके वाय गेली आहेत. तर आता गेल्या 25 दिवसात पावसाने उघडीप घेतल्याने उर्वरित 20 टक्के पिकेही वाळली आहेत. त्यानंतर आता पावसानं हजेरी लावली आहे. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसह बाधित क्षेत्रात भर पडून एकूण सात लाख 41 हजार शेतकऱ्यांचे पाच लाख 27 हजार हेक्टर मधील खरीपासह बागायती आणि फळ पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा सुधारित अहवाल शासनाकडे पाठवला आहे. यात बाधितांना  एनडीआरएफच्या नव्या निकषनुसार (दुप्पट भरपाई ) भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने 717 कोटी 88 लाख 91 हजार 600 रुपयाची मागणी शासनाकडे केली आहे.

आजही राज्यात पावसाचा अंदाज 

हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस  झाला आहे. मुंबईसह ठाणे परिसरात रात्री पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसाचा वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळालं. पावसामुळं सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक संथ गतीनं सुरु होती. तसेच पुणे, सोलापूर या जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, आजही हवामान विभागानं राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज कोकणात पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रात देखील पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Drought: दुष्काळाचा पहिला फटका बसला, सोलापूरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला, चारा वाहतुकीवर निर्बंध
दुष्काळाचा पहिला फटका बसला, सोलापूरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला, चारा वाहतुकीवर निर्बंध
Maharashtra Rain : राज्यात पाऊस येणार, शेतकऱ्यांना तारणार!  पण कुठं आणि कधी? पंजाबराव डखांनी वर्तवला महत्वाचा अंदाज
राज्यात पाऊस येणार, शेतकऱ्यांना तारणार! पण कधी आणि कुठं? पंजाबराव डखांनी वर्तवला महत्वाचा अंदाज
1972 चा दुष्काळ! पवारसाहेब पालकमंत्री आणि विजयदादा जिल्हा परिषदचे अध्यक्ष, कसं केलं नियोजन? धैर्यशील मोहिते पाटलांनी सांगितला इतिहास
1972 चा दुष्काळ! पवारसाहेब पालकमंत्री आणि विजयदादा जिल्हा परिषदचे अध्यक्ष, कसं केलं नियोजन? धैर्यशील मोहिते पाटलांनी सांगितला इतिहास
महापुराची मदत मिळाली नाही, कर्जमाफीचे पैसे मिळाले नाहीत, दुष्काळाचा GR निघाला पण मदत...आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
महापुराची मदत मिळाली नाही, कर्जमाफीचे पैसे मिळाले नाहीत, दुष्काळाचा GR निघाला पण मदत...आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

व्हिडीओ

Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tata : टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, दोन कंपन्यांच्या विलिनीकरणाचं नियोजन सुरु
टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, विलिनीकरणाचा डाव टाकणार
MLAs Respect Mandatory Rules : आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
Satara: सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी साताऱ्यात घडामोडींना वेग, नेत्यांच्या भेटीगाठी सुरुच, शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली उदयनराजेंची भेट 
सातारा जिल्हा बँकेसाठी नेत्यांच्या भेटीगाठी सुरु,शिवेंद्रराजेंनी घेतली उदयनराजेंची भेट, निवडणूक महायुती म्हणून लढण्यावर एकमत
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
Election : माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला, पुणे शिक्षक मतदारसंघातून रिंगणात उतरणार, विधानपरिषदेची रणधुमाळी सुरु  
माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला,पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीची आशा
आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली
आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली
Embed widget