एक्स्प्लोर

तात्पुरत्या फायद्यासाठी शेतकऱ्यांचा विश्वास तोडू नका, शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणेच द्या, राजेश टोपेंचं आवाहन 

दुकानदारांनी शेतकऱ्यांना चांगले, दर्जेदार बियाणेच द्यावे असे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केलं. तात्पुरत्या फायद्यासाठी शेतकऱ्यांचा विश्वास तोडू नका असेही टोपे म्हणाले

Rajesh Tope : सध्या खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकरी खते बी बियाणांची खरेदी करताना दिसत आहेत. कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होताना दिसत आहे. दरम्यान, अशातच बियाण्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या काही बाबी निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळं दुकानदारांनी शेतकऱ्यांना चांगले, दर्जेदार बियाणेच द्यावे असे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केलं आहे. तसेच तुमच्या तात्पुरत्या फायद्यासाठी शेतकऱ्यांचा विश्वास तोडू नका असेही टोपे म्हणाले.

बियाणं खराब निघालं तर शेतकऱ्यांचं संपूर्ण वर्ष वाया जातं

बियाण्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या काही बाबी आमच्या निदर्शनास आल्या असल्याचे टोपे म्हणाले. माझे सर्व दुकानदारांना विनंतीवजा आवाहन आहे, की शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना योग्य कंपनीचेच बियाणे द्यावे. हा बळीराजा तुमच्यावर मोठा विश्वास ठेवून बियाणे खरेदी करतो. कोणत्याही तात्पुरत्या फायद्याकरता शेतकऱ्यांचा विश्वास आपण तोडू नये, एकदा हा विश्वास तुटला तर तो पुन्हा मिळणे अशक्य असल्याचे टोपे यावेळी म्हणाले. या बियाण्यांच्या भरोशावर शेतकरी संपुर्ण वर्ष पिकांची वाट बघतात. मग बियाणे खराब निघाले तर संपूर्ण वर्ष वाया जाते. याची परिणीती म्हणून नंतरचे दोन ते तीन वर्षे शेतकरी कर्जबाजारी होऊन डबघाईस येतो. हाच कर्जबाजारी शेतकरी मग जीवनात काहीतरी टोकाचा निर्णय घेतो असे टोपे म्हणाले.

बळीराजा जगला तरच आपण सगळे जगू

माझी सर्व बियाणे दुकानदारांना पुन्हा एकदा विनंती आहे, शेतकऱ्यांना चांगले व दर्जेदार बियाणेच सुचवून खरेदी करण्याचा आग्रह करा. सर्व बियाणे दुकानदार हे सुद्धा एक शेतकरीच आहेत. बळीराजा जगला तरच आपण सगळे जगू असेही राजेश टोपे म्हणाले. दरम्यान काही दुकानदारांकडून बियाणांच्या बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी विभाग देखील सज्ज झाला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई होणार असल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

महत्त्वाच्या बातम्या

सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Farmers Loan Waiver: मोठी बातमी! प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र; राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे
मोठी बातमी! प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र; राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget