Kisan Drone : गरुडा एरोस्पेसनं तयार केलेल्या किसान ड्रोनसाठी प्रथमच कर्ज मंजूर, शेतकऱ्यांना होणार फायदा
गरुड एरोस्पेसने तयार केलेल्या किसान ड्रोनसाठी (Kisan Drone) पहिले कृषी ड्रोन कर्ज मंजूर करण्यात आलं आहे. आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात या कर्जाचं वितरण करण्यात आलं.

Garuda Aerospace Kisan Drone : गरुड एरोस्पेसने तयार केलेल्या किसान ड्रोनसाठी (Kisan Drone) पहिले कृषी ड्रोन कर्ज मंजूर करण्यात आलं आहे. आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात या कर्जाचं वितरण करण्यात आलं. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यासह राज्यमंत्री शोभा करंदलाजे आणि मंत्री कैलास चौधरी उपस्थित होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये गरुड किसान ड्रोनला हिरवा झेंडा दाखवला होता. त्यावेळी देशभरातल्या 100 गावांमध्ये या ड्रोनची चाचणी देखील घेण्यात आली होती. या ड्रोनमुळे शेतकऱ्यांना कीटकनाशके आणि खते फवारणीसाठी मोठी मदत होणार आहे.
2024 पर्यंत 1 लाख मेड इन इंडिया किसान ड्रोन तयार करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी या वर्षी फेब्रुवारीमध्ये गरुड किसान ड्रोनला मान्यता दिली होती. तेव्हापासून आमचे लक्ष्य आमच्या प्रमाणित किसान ड्रोनसाठी कर्ज मंजूरी मिळवणे हे होते. गरुडा एरोस्पेसनं आधीच 2 हजार 500 हून अधिक ड्रोन प्री-बुक केले आहेत. 2024 पर्यंत आम्ही 1 लाख मेड इन इंडिया किसान ड्रोन तयार करण्याच्या मार्गावर असल्याची माहिती गरुडा एरोस्पेसचे संस्थापक आणि सीईओ अग्नेश्वर जयप्रकाश (Agnishwar Jayaprakash ) यांनी दिली. गरुडा एरोस्पेसचे कंपनी भारतातील सर्वात मौल्यवान ड्रोन स्टार्टअप बनवत आहे. 2023 पर्यंत युनिकॉर्नचा दर्जा प्राप्त करण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे जयप्रकाश यांनी सांगितले. दरम्यान, महेंद्रसिंग धोनीने नुकतीच गरुडा एरोस्पेसमध्ये गुंतवणूक केली आहे. तो ब्रँड अॅम्बेसेडर बनला आहे.
25 जणांना ड्रोनसाठी कर्जाचं वितरण
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात किसान ड्रोनवर 40 ते 100 टक्के अनुदान योजना, परदेशी ड्रोनच्या आयातीवर बंदी आणि 120 कोटी उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन योजनांची घोषणा केली होती. यासारख्या प्रगतीशील सरकारी धोरणांमुळे गरुड एरोस्पेस किसान ड्रोनची मागणी वाढली आहे. आजच्या कार्यक्रमात 25 जणांना ड्रोनसाठी कर्जाचं वितरण करण्यात आलं. कर्ज मंजूर झालेल्या राम कुमार यांनी कृषी ड्रोनसाठी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. माझे स्वप्न पूर्ण झाले आहे, आम्ही आता गरुड एरोस्पेस किसान ड्रोन खरेदी करण्यासाठी सक्षम आहोत. किसान ड्रोन हे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहे. अचूक फवारणी त्याची गरज असल्याचे मत यावेळी राम कुमार यांनी व्यक्त केले. दररोज 25 एकर क्षेत्राची फवारणी शक्य असल्याचे त्यांन सांगितले. कृषी इन्फ्रा फंड कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करतो. या माध्यमातून शेतकरी केंद्रित असलेल्या अनेक नवीन निधी योजनांचे नेतृत्व केले आहे. कृषी ड्रोन कर्ज हे शेतकरी समुदायासाठी एक मोठा गेम चेंजर असू शकते असे मत सहसचिव सॅम्युअल प्रवीण कुमार यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या:
- Kolhapur : राज्यात High Tech शेती, Drone चा वापर करत होणार ऊसावर औषध फवारणी
- Osmanabad Drone : 10 मिनटात अर्धा एकरावर Drone ने फवारणी; वेळ, पैसे आणि पाण्याची बचत ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
