एक्स्प्लोर

Gadchiroli : हत्तींचा हैदोस, पिकांचं मोठं नुकसान; तात्काळ मदत द्या अन्यथा...शेतकऱ्यांनी दिला संपुर्ण कुटुंबांसह आत्मदहनाचा इशारा 

गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात हत्तीच्या (elephants) कळपांनी हैदोस घातला आहे. हे हत्तीचे कळप मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी करत आहेत.

Gadchiroli News: गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात हत्तीच्या (elephants) कळपांनी हैदोस घातला आहे. हे हत्तीचे कळप मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी करत आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. देसाईगंज तालुक्यापासून 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या हलबी पिंपळगाव येथील शेतकऱ्यांच्या शेती पिकांची जंगली हत्तीच्या कळपानं मोठी नासाडी केलीय. उभ्या पिकात हत्तींनी उत्पात मांडलाय. 

तुटपुंजी आर्थिक मदत, शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने 

हत्तींनी पिकांचं नुकसान केल्यानंतर शेतकऱ्यांना अत्यल्प तुटपुंजी आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेता एकूणच झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात किमान 50 हजार रुपये प्रती एकर आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी, अन्यथा संपुर्ण कुटुंबासह सामुहिक देहत्याग करण्याचा इशारा हलबी पिंपळगाव येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे. देसाईगंज तहसीलदारामार्फत शासन, प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून दिला आहे. 

जगायचे कसे? शेतकऱ्यांचा प्रश्न

दरम्यान, तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की,  22 सप्टेंबर 2023 पासून जवळ जवळ 8 ते 10 दिवस जंगली हत्तीच्या कळपाचा हलबी पिंपळगाव शेतशिवार परिसरात उत्पात सुरु होता. जंगली हत्तींना पिटाळून लावण्यासाठी वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने जीव धोक्यात घालून शर्थिचे प्रयत्न सुरु होते. मात्र, तरीही जंगली हत्तींनी जवळजवळ पिक तयार झाले असताना उभ्या पिकात उत्पात मांडून तोंडघशी आलेले पिक नेस्तनाबूत करुन टाकले आहे. लागवडीचा खर्च जवळपास 25 हजार रुपये प्रती एकर असला तरी शासकीय स्तरावरुन तुटपुंजे आणि अल्प मदत देण्याचे आश्वासन देण्यात येत आहे. ते देखील कधी मिळेल याची देखील शाश्वती नसल्यानं शेतकऱ्यांनी जगायचे कसे? कशाच्या भरोशावर पोट भरायचे? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

नुकसानीच्या प्रमाणात एकरी किमान 50 हजार रुपये मदत द्यावी

प्रचंड प्रमाणात नुकसान झालं असल्याने यातून तूर्तास सावरणे शक्य नसल्यानं शासनाने झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात किमान 50 हजार रुपये प्रती एकर आर्थिक मदत जाहीर करावी. दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करावी. अन्यथा, विरोधात संपुर्ण कुटुंबासह सामुहिक देहत्याग करण्यावाचून पर्याय नसल्याचं शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. त्यामुळं यावर आता शासन स्तरावर काय निर्णय घेतला जातो याकडं शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News: भंडारा जिल्ह्यात टोमॅटोची 'लाली' उतरली, शेतकऱ्यांचा अन्य पिकांकडे कल; नेमकी काय आहेत कारणं?

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली, किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याची मागणी, खासदा ओमराजेंचं कृषीमंत्र्यांना पत्र
Tanaji Sawant: लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
Dattatray Bharane: शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget