एक्स्प्लोर

नोकरी सोडून पिकवली कोरफड, साताऱ्याच्या युवा शेतकऱ्याची वार्षिक उलाढाल तब्बल 3.5 कोटी!

पारंपरिकतेचा मोह जुन्या शेतकऱ्यांना सुटणं तसं कठीण. पण साताऱ्याच्या या शेतकऱ्यानं कुतुहलानं कोरफड लावली आणि हा निर्णय त्याचं नशीब बदलणारा ठरला.

Agriculture Success Story: आधुनिक शेतीची कास धरत आजकाल अनेक शेतकरी लाखोंची उलाढाल करताना दिसतात. शिक्षण झालं की नोकरीच्या मागे न लागता महाराष्ट्रात अनेकांनी शेती करणं पसंत केल्याची आता अनेक उदाहरणं आहेत. साताऱ्यात नोकरी सोडून एका युवा शेतकऱ्यानं त्याच्या शेतात कोरफड लावली. आता आंतराष्ट्रीय मागणीमुळे तसेच देशांतर्गत कोरफडीच्या अनेक पदार्थांची मागणी होत असताना त्याला मोठा फायदा झालाय. केवळ कोरफडीतून त्यानं वर्षाला साडेतीन कोटींची उलाढाल केलीये. 

कोरफड लागवडीतून (Alovera Farming) आणि त्यातून बनवलेल्या उत्पादनातून ३० टक्के नफा कमवत त्यानं तब्बल ३.५ कोटी रुपये कमावलेत. 'द वोकल न्यूज'च्या वृत्तानुसार ह्रषिकेश ढाणे असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. चिकाटी आणि नाविन्यपूर्णतेने शेती करत त्यांनं त्याच्यासह कुटुंबाचीही आर्थिक प्रगती साधलीये.

पारंपरिक पिकांना फाटा देत केली कोरफड शेती

जगभरात सध्या कोरफडीसह आयुर्वेदिक आणि शाश्वत गोष्टी वापरण्यावर बहुतांश जणांचा भर असल्याचं दिसून येतं. त्वचेसह शरीराच्या अनेक आजारांवर रामबाण समजली जाणारी कोरफड भारतासह परदेशातही सर्रासपणे वापरताना दिसतात. कोरफडीचे महत्व लक्षात घेत आपल्या जमिनीवर कोरफड लावण्याची कल्पना खरंतर धाडसाचीच. पारंपरिकतेचा मोह जुन्या शेतकऱ्यांना सुटणं तसं कठीण असताना ऋषिकेशनं कुतुहलानं कोरफड लावली आणि हा निर्णय त्याचं नशीब बदलणारा ठरला. आता सरासरी ८ हजार लिटर कोरफडीपासून उत्पादने बनवून कोट्यवधी रुपये कमवत आहे.

टाकून दिलेल्या कोरफडीतून झाली सुरुवात

साताऱ्यातील पाडळी येथील शेतकऱ्यांना पहिल्यांदा कोरफडीची लागवड करण्याची कल्पनेची एका व्यावसायिकाने ओळख करून दिली. 'कोरफड वाढवा, लाखो कमवा' या घोषणेचं ऋषिकेशला कुतुहल वाटलं. अधिक चौकशी केली असता त्याला हा सगळाच प्रकार संशयास्पद वाटला. पण तोपर्यंत गावातल्यांनी कोरफड लावली होती. जसजशी कापणीची वेळ जवळ येऊ लागली  तसा व्यापारी गायब झाला. आणि शेतकऱ्यांच्या कोरफडीला कोणी वाली उरला नाही. त्यातील कित्येकांनी कोरफड अक्षरश: टाकून दिली.  ऋषिकेशने या शेतकऱ्यांची टाकून दिलेल्या कोरफडीची रोपे आणून स्वत:च्या शेतात लावली. आणि आता त्याची कमाई पाहून गावातील शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.

मार्केटिंग कंपनीतील नोकरी सोडली आणि रोपवाटीका केली सुरु

कौटुंबिक परिस्थिती बेताची असल्याने वयाच्या २० व्या वर्षी ऋषिकेशने मार्केटिंग कंपनीत नोकरी केली. परंतू ती टिकली नाही.त्यामुळं त्यानं गावात एक रोपवाटिका सुरु केली. २००७ मध्ये जेव्हा गावातील लोकांनी कोरफड टाकून दिली तेंव्हा त्याकडे ऋषिकेशने एक संधी म्हणून पाहिले  आणि ४००० कोरफडीची रोपे लावली. त्यापासून त्याने साबण, शॅम्पू, ज्यूस अशी विविध उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली.२०१३ पर्यंत त्यानं कोरफडीच्या उत्पादनांचं व्यवसायात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा:

डाळिंबाच्या बागेतून 51 लाखांचे उत्पन्न, नव्या घराचे स्वप्न केलं पूर्ण, नगरच्या युवा शेतकऱ्यांना काय केलं बघा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaubeej 2024 Wishes : भाऊबीजेनिमित्त लाडक्या भाऊरायाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्यातील गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
भाऊबीजेनिमित्त लाडक्या भाऊरायाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्यातील गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 11 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaMahim Vidhansabha Election Special Report : माहीमचा किल्ला, मतभेदाचे तडे?ABP Majha Headlines :  10  PM :   2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 9 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaubeej 2024 Wishes : भाऊबीजेनिमित्त लाडक्या भाऊरायाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्यातील गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
भाऊबीजेनिमित्त लाडक्या भाऊरायाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्यातील गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
Embed widget