Indian mangoes to USA : भारतीय आंबे- डाळिंबांची अमेरिकेत होणार विक्री, अमेरिकेकडून आयातीला परवानगी
भारतातील आंबे (mangoes) आणि डाळिंबाची (Pomegranate) अमेरिकेला निर्यात होणार आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने आयातीला परवानगी दिली आहे.

Indian mangoes to USA ; भारतातील आंबा (mangoes) आणि डाळिंबाची (Pomegranate) आता अमेरिकेत निर्यात होणार आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने या आयातीला परवानगी दिली आहे. त्यामुळे अमेरिकेतील ग्राहकांना उत्कृष्ट प्रतीचे भारतातील आंबे उपलब्ध होणार आहेत. भारतीय कृषी विभागाने याबाबतची माहिती दिली आहे.
भारतातील आंबे आणि डाळिंबाची अमेरिकेला निर्यात होईल तर अमेरिकेची चेरी व अल्फाल्फा गवताची भारतात आयात होणार आहे. येत्या मार्च महिन्यापासून भारतातील हापूस आंब्याची निर्यात होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या आंबा उत्पादक पट्ट्यातील आंब्यांच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे.
भारतातून या आधीही अमेरिकेला आंब्याची निर्यात होत होती. परंतु, कोरोनाच्या महामारीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे अमेरिकेच्या कृषी विभाच्या निरीक्षकांना विकिरण सुविधेच्या तपासणीसाठी भारतात येता येत नव्हते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून भारतीय आंब्याच्या आयातीवर अमेरिकेकडून निर्बंध घालण्यात आले होते. परंतु, 23 नोव्हेंबर 2021 रोजी भारत आणि अमेरिकेच्या व्यापार धोरण मंचाची एक बैठक झाली होती. त्यामध्ये भारतातील आंबा आणि डाळिंबाची अमेरिकेत आयात करण्यास मंजूरी देण्याच्या धोरणाला परवानगी देण्यात आली.
अमेरिकेत भारतीय आंब्यांना चांगली पसंती असून तेथील ग्राहकांकडून आंब्यांना मोठी मागणी आहे. भारताने 2017-18 मध्ये 2.75 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स निर्यात मूल्याच्या 800 टन आंब्यांची अमेरिकेला निर्यात केली होती. 2017-18 आणि 2019-20 मध्ये भारतातून अमेरिकेला झालेल्या निर्यातीपेक्षा 2022 मध्ये निर्यात जास्त असेल अशी कृषी विभागाची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sri Lanka Inflation: श्रीलंकेत महागाईचा भडका; टोमॅटो 200 तर मिर्ची 700 रूपये प्रति किलो
- North Korea : किम जोंग उनचा हेतू काय? उत्तर कोरियाकडून आठवड्याभरात दुसऱ्यांदा क्षेपणास्त्र चाचणी
- Upcoming Movies and Web Series : 'मिर्झापूर सीझन 3' पासून 'गेहरियां'पर्यंत यावर्षी प्राइम व्हिडिओवर मनोरंजनाचा संपूर्ण डोस
Before You Go
Dharashiv Crop Loss : धाराशिवमध्ये अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल





















