एक्स्प्लोर

#ओलादुष्काळ : जिवंत असूनही शेतकरी मेलाय, जळणारही नाही कारण ओला दुष्काळाय 

#ओलादुष्काळ : राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने हाहाकार केल्याने शेतकरी पूर्णत: कोसळून गेला आहे. विशेष करून पिके तोंडाला आलेली असतानाच ऑक्टोबरच्या पावसाने पार वाताहत केली.

#ओलादुष्काळ : राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने हाहाकार केल्याने शेतकरी पूर्णत: कोसळून गेला आहे. विशेष करून पिके तोंडाला आलेली असतानाच ऑक्टोबरच्या पावसाने पार वाताहत केली. त्यामुळे परिस्थिती भयावह झाली आहे. त्यामुळे पिचलेल्या पोशिंद्याला पुन्हा एकदा बळ देण्यासाठी सोशल मीडियातून #ओलादुष्काळ जाहीर करण्यासाठी एल्गार करण्यात आला आहे. 

राज्यातील पिकांची झालेली नासाडी पाहता #आम्ही_शेतकऱ्यांसोबत #ओलादुष्काळ या ट्रेंडवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे  ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी सोशल मीडियातून करण्यात येत आहे. आनंदाच्या शिध्यासोबत जर तुम्ही पिकविमा, अनुदान दिले असते, तर आमची दिवाळी खऱ्या अर्थाने आनंदी झाली असती, असेही काही पोस्टमधून म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी वेगवेगळ्या स्लोगनही सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत. 

शेतकऱ्यांची जेव्हा बसेल जीवनाची घडी
उच्चशिक्षित होईल शेतकऱ्यांची पिढी
पीक मालाचा भाव ठरवेल हा बळी
तेव्हाच आमची साहेब, हॅपी दिवाळी! हॅपी दिवाळी!!

---------------

दंगली माजवून तुम्ही भाजता सत्तेची पोळी
आंदोलकच झेलत असतो छातीवरती गोळी
आमचं दिवाळं आणि तुमचीच साहेब, हॅपी दिवाळी! हॅपी दिवाळी!!

-----------------

दंगली माजवून तुम्ही भाजता सत्तेची पोळी
आंदोलकच झेलत असतो छातीवरती गोळी
आमचं दिवाळं आणि तुमचीच साहेब, हॅपी दिवाळी! हॅपी दिवाळी!!

-------------

काय झक् मारणार लाल दिव्याची गाडी 
सत्ताधिशांचे बंगले अन् माडीवर माडी
आमचं दिवाळं आणि तुमचीच साहेब, हॅपी दिवाळी! हॅपी दिवाळी!!

----------------

अरे! ह्या ही वेळेस नापिकीने 
आणली आत्महत्येची पाळी!
आमचं दिवाळं आणि तुमचीच साहेब, हॅपी दिवाळी! हॅपी दिवाळी!!

---------------

काय करू मी कारभारणी,
दिवाळं आलं, दिवाळी नाही, 
गहाण ठेवलेलं गंठन सोडवायला
कारभारच आपला राहिला नाही!

-------------

जेव्हा वाट मी पाहतो तू रुसुन बसतो! 
आज नको असताना डोक्यावर तू कोसळतो !!

---------------

जिवंत असूनही शेतकरी आज मेला आहे.
जळणार ही नाही तो कारण दुष्काळ ओला आहे.

----------------

असच आमच्या आयुष्यान उघड्या डोळ्यांनी मरण पाहायचं ! 
उभ्या जगाचा पोशिंदा म्हणुन त्यान कायम उपाशी राहायचं..!

------------------

कोणाला भेटली ढाल, तर कोणाला भेटली मशाल
पण कोणत्याच सरकारला दिसेना शेतकऱ्याचे हाल

------------------

ए. सी.त बसणाऱ्यांनो
रुमणं हातात घेऊन बघा
माझ्या बळीराजाच काळीज लेवून
एक दिवस जगून बघा

------------------

पेरण्याअगोदर आणि पेरून झाल्यावर शेतकरी तुझ्यासाठीच तरसतो, मग 
काढणीला आल्यावरच बाजार कोसळतो आणि का तु बेभान बरसतो..!

-------------------

कृषीप्रधान देशात, 
शेतकरी बेहाल !
नेते बनतात,
रातोरात मालामाल !

-----------------------

भावनेसोबत त्याच्या बघा ना काय थट्टा झाली…सोयाबीन विकताना दलाली झाली, पोटाला जगताना मात्र त्याच सोयाबीन तेलाची किंमत दुप्पट झाली!

---------------
अतिवृष्टी होऊन अनुदान नाकारलं,
म्हणून आता आम्ही रणशिंग पुकारलं

--------------------

उठ वेड्या, तोड बेड्या,
लढाईत सामील हो आता गड्या
शेतकऱ्याच्या कष्टावर जगाने खूप कमावलं,
माझ्या बापाने मात्र जीवन गमावलं

-------------------

खूप लढलो नेत्यांसाठी,
आता लढू शेतकऱ्यांसाठी
सोयाबीन गेलयं, कापूस गेलाय
उघड्यावर आलंय घर-दार,
सरकार देईल का आधार..?

--------------------

कशाचा पंचनामा करायचाय?
पिकांचा की शेतकरी मृतदेहाचा?

------------------

बोनसच्या जीवावर तुमची दिवाळी तुपाशी,
सरकार देतंय शेतकऱ्यांना फाशी

--------------

कर्ज घेऊन दिवाळी आली,
वर यंदाही नापिकी झाली
घोर मनाला लावू नका,
पाठ जगाला दाऊ नका,
साथीला आम्ही आहोत ना,
जहर तेवढं खाऊ नका !

------------------------

गावचा खाता आटा, 
मग आता शेतकरी बापासाठी 
खर्च करू थोडासा डेटा

---------------------

मुख्यमंत्री एकनाथ,
शेतकरी अनाथ

-------------------

मातीत... मातीत मळतात माणसं,
उन्हात...उन्हात तळतात माणसं,
कशी जीवाला खातात खस्ता,
त्याचा जीव लै सस्ता...

-------------------

चिखलाचा तुडवीत रस्ता,
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता

---------------

शेतकरी पुत्रांनो जागे व्हा,
आज पीक विमा खाल्ला,
उद्या जमीन खातील

------------

परतीच्या पावसाचा कोल्हापूर जिल्ह्यात कहर 

दुसरीकडे परतीच्या पावसाने निरोप घेतला असला, तरी पिकांची मात्र जिल्ह्यात चांगलीच नासाडी झाली आहे.  कोल्हापूर जिल्ह्यातील 3 हजार 107 हेक्टरचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका सोयाबीन आणि भाजीपाल्याला बसला आहे. या संदर्भात प्रत्येकांच्या पंचनामाचा अंतिम अहवाल लवकरच येईल त्यानंतर संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतनीती दिला जाईल, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. 

पालकमंत्री केसरकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याला परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. ऑक्टोबरपर्यंत झालेल्या पंचनाम्यामध्ये 3107 हेक्टर क्षेत्रांमधील पिकाचे नुकसान झाले आहे, अजूनही पंचनामे सुरू आहेत. पंचनामा झाल्यावर हा अहवाल शासनाकडे पाठवून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. 

जिल्ह्यातील 944 हेक्टरवरील भाजीपाला, 871 हेक्टर सोयाबीन, 54.30 हेक्टर भात, 858 हेक्टर भुईमूग, 80 हेक्टरवरील विविध फुले, 275 हेक्‍टर इतर पिके व 25 हेक्टरवरील फळांचे नुकसान झाले आहे. शिरोळ तालुक्यात सर्वाधिक 2313 हेक्टरवरील नुकसान झाले आहे. हातकणंगले तालुक्यात 933, शाहूवाडी 49 हेक्टर, करवीर तालुक्यात 8.10 तर भुदरगड मधील 4 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून  नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
Ajit Pawar : दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
Panhala Fort : पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dmart Marathi Language Issue News | 'नाही येत मराठी..', परप्रांतीयांकडून माज, मनसैनिकांनी दाखवला 'मराठी' इंगाSpecial Report | Waghya Dog Statue Issue | 'वाघ्या'चं कारण, जातीवरुन राजकारणSpecial Report | Disha Salian | आरोपांना ड्रग्जची 'दिशा', आदित्य ठाकरेंविरोधात स्फोटक आरोपRajkya Shole | Prashant Koratkar | कोरटकरचा आका कोण?महिनाभर पोलिसांना गुंगारा,कोरटकरला आसरा  कुणाचा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून  नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
Ajit Pawar : दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
Panhala Fort : पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
Sanjay Raut Kunal Kamra :  कुणाल कामराकडून नवा व्हिडिओ शेअर, संजय राऊतांची तीन ओळींची नवी पोस्ट, म्हणाले...
कुणाल कामराकडून नवा व्हिडिओ शेअर, संजय राऊतांची तीन ओळींची नवी पोस्ट, म्हणाले...
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
Embed widget