एक्स्प्लोर

साखर कारखान्यांबाबत केंद्राचा आणखी एक महत्त्वाचा निर्णय, आजारी कारखान्यांना बळ मिळणार

आज केंद्र सरकारनं आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाने जवळपास देशभरातल्या 60-65 साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नवी दिल्ली : केंद्रात सहकार मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अमित शाहांनी साखर उद्योगासाठी गेल्या दोन दिवसात दोन अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.  एफआरपीपेक्षा जास्त भाव दिला म्हणून त्या फरकावरील रकमेवर लागू केलेला साडे नऊ हजार कोटी रुपयांचा प्राप्तिकर केंद्र सरकारनं रद्द केला होता. आज केंद्र सरकारनं आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एस डी एफ म्हणजे साखर विकास निधी अंतर्गत घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन होणार आहे. 

केंद्र सरकारच्या निर्णयाने जवळपास देशभरातल्या 60-65 साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 3200 कोटी रुपयांच्या कर्जाचं पुनर्गठन होणार असल्याची माहिती आहे.  दोन वर्षांचा विलंब अवधी, त्याच्या पुढच्या पाच वर्षात सुलभ हप्त्यात कर्ज फेडण्याची कारखान्यांना मुभा असणार आहे. तसेच दंडव्याजही पूर्णपणे माफ होणार आहे. कारखान्यांवर बुडित कर्जाच्या नोटीसाही थांबणार आहेत. 

साखर कारखान्यांनी राष्ट्रीयीकृत बॅंका आणि सहकारी बँकांकडून घेतलेल्या कर्जाच्या पुनर्गठनाचीही मागणी आहे. पण तूर्तास एसडीएफ कर्जाबाबत दिलासा मिळाला आहे. एसडीएफ हा कारखान्यांनीच स्थापन केलेला निधी आहे. त्यातून वेगवेगळ्या कारणांसाठी कर्ज दिली जायची पण गेल्या काही वर्षांत या कर्जावर ही केंद्र सरकारने बंदी आणली होती.  आता या निर्णयामुळे अनेक आजारी साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

प्राप्तिकर आकारणीचा मुद्दाही निकालात
गेल्या 35 वर्षांपासून साखर उद्योगाची डोकेदुखी बनला होता तो प्राप्तिकर आकारणीचा मुद्दा निकालात निघाला आहे. एफआरपीपेक्षा जास्त भाव दिला म्हणून त्या फरकावरील रकमेवर लागू केलेला साडे नऊ हजार कोटी रुपयांचा प्राप्तिकर केंद्र सरकारनं  रद्द केला आहे. राज्यातल्या जवळपास शंभर साखर कारखान्यांना आणि पर्यायानं 40 लाख उस उत्पादक शेतकऱ्यांनाही त्यामुळे दिलासा मिळेल.  देशातल्या सहकारी साखर कारखान्यांवर हे दावे 1985-86 पासून प्रलंबित होते. अनेक कारखान्यांना वसुलीच्या नोटीसाही प्राप्त झाल्यानं कारखानदारांमध्ये नाराजीचंही वातावरण होतं. आता केंद्राच्या या निर्णयामुळे वसुलीच्या नोटीसींपासून कारखानदारांना दिलासा मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टींचा एल्गार, 13 जिल्ह्यातील शेतकरी पंढरपुरात एकत्र येणार, आषाढीपूर्वी भव्य पायी सदबुध्दी यात्रा
शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टींचा एल्गार, 13 जिल्ह्यातील शेतकरी पंढरपुरात एकत्र येणार, आषाढीपूर्वी भव्य पायी सदबुध्दी यात्रा
Maharashtra Rain : राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस, 8 जुलैपासून पावसात घट होणार, शेतकरी चिंतेत
राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस, 8 जुलैपासून पावसात घट होणार, शेतकरी चिंतेत
Vidarbha Cow Scam: पशुसंवर्धन विभागाचा संतापजनक कारभार! जन्मात कोंबडी पाळली नाही, त्याच्या नावावर लाटले गाईंचे पैसे; विदर्भातील 'त्या' योजनेचा धक्कादायक खुलासा
पशुसंवर्धन विभागाचा संतापजनक कारभार! जन्मात कोंबडी पाळली नाही, त्याच्या नावावर लाटले गाईंचे पैसे; विदर्भातील 'त्या' योजनेचा धक्कादायक खुलासा
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Embed widget