Banana Farming Issue :  राज्यामध्ये अनेक जिल्ह्यात तापमान 40 अंशापेक्षा जास्त तापमान झालं आहे. उन्हामुळे अनेक लोक घराच्या बाहेर देखील जात नाहीत. उन्हाचा त्रास हा शेतकरी वर्गाला जरा जास्त होत आहे. आसमानी, सुलतानी त्रास सहन करणारा शेतकरी नेहमीच संकटात सापडलेला दिसून येतो. आता वाढत्या तापमानाचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहे. वाढत्या तापमानामुळे केळीच्या बागांना फटका बसताना दिसून येत आहे. महाराष्ट्रामध्ये जळगावनंतर हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव शेतशिवारातील केळीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु हा केळी बागायतदार शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. यामुळं हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याची भावना शेतकऱ्यांची आहे. 


गिरगाव भागामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सर्वाधिक केळीचे उत्पादन घेतले जाते.  या केळींची विशेष मागणी जास्त असते कारण या केळीचा आकार मोठा आणि वजन जास्त असतो. या केळींना देशभरात मागणी असते. परंतु याच केळीचे उत्पादन घेणारे शेतकरी संकटात सापडले आहेत. याचं कारण आहे वाढतं तापमान. वाढत्या तापमानामुळे केळीच्या उत्पादनात मोठी घट होत आहे. तसेच विक्रीसाठी तयार असलेल्या फळांना काळे डाग पडत आहेत. 


गिरगाव येथील शेतकरी सुभाष रायवडे यांनी यांच्या शेतातील 5 एकर शेत जमिनीवर 3 लाख रुपये खर्च करून केळीच्या बागेची लागवड केली. परंतु वाढत्या तापमानामुळे केळीच्या बागेचे मोठे नुकसान होत आहे. गेल्या 20 वर्षात  पहिल्यांदा यावर्षी उन्हाचा तडाखा केळीच्या बागांना बसत आहेत.


उत्पादन चांगल्या पद्धतीचे होईल या अपेक्षेने शेतकरी सुभाष राजवाडे यांनी यांच्या शेतात तीन लाख रुपये खर्च करून केळीच्या बागेची लागवड केली. परंतु या उन्हाच्या तडाख्यात अनेक केळीची झाडे मोडून पडत आहेत.


पारंपरिक शेती परवडत नाही म्हणून शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीला सुरुवात केली खरी मात्र कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस तर कधी कडक उन्हाळा यामुळे केळी पिकांचं मोठं नुकसान होत आहे. असं असताना देखील शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने केळी पिकवली तर नंतर त्यांना भाव मिळेलच याचीही गॅरंटी नाही. आपल्याकडे केळी पिकवणारा शेतकरी हा बागायतदार शेतकरी समजला जातो. आता मात्र याच बागायतदार शेतकऱ्यांवर परवडत नाही म्हणून केळीचे झाड शेतीच्या बाहेर टाकण्याची वेळ आली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या




काढायलाही परवडत नाही म्हणून झाडावरच पिकतायेत केळी! शेतकरी हवालदिल; केळीच्या बागा केल्या उध्वस्त